ल्ोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत काही वर्षांपासून बंद असलेले जालना शहरातील बंद पथदिवे पुन्हा झळाळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील आठवड्यात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक घेऊन हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यात येणार आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी मंत्रालयातील दालनात घेतली. शहर विकासाशी निगडित अन्य महत्त्वाच्या मुद्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.शहरातील पथदिव्यांचे सुमारे दहा कोटींचे बिल थकल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे राज्यमंत्री खोतकर यांनी सुरूवातीलाच शहरातील ज्वलंत समस्या बनलेल्या बंद पथदिव्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याप्रमाणे बैठकीत शहरात होत असलेली सर्व विकास कामे दर्जेदार व जलद गतीने करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महात्मा फुले मार्केटच्या पुनर्निर्माणाबाबत नवीन प्रस्तावासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल,माजी आ. कैलाश गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, मुख्यधिकारी संतोष खांडेकर, नियोजन अधिकारी विकास, नगर रचनाकर, नगर अभियंता बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जालना पालिकेचे शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीत पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी आवश्यक त्या सर्व बाबी करण्याबाबतच्या सूचना राज्यमंत्री खोतकर यांनी दिल्या.
बंद पथदिवे पुन्हा झळाळणार
By admin | Published: June 01, 2017 12:33 AM