शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

सिल्लोडमध्ये दस्तनोंदणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:40 AM

ग्रीनझोनच्या नावाखाली अडवणूक : चिरीमिरी दिल्यास होतो व्यवहार

श्यामकुमार पुरेसिल्लोड : गेल्या महिन्यापासून ग्रीन झोनच्या नावाखाली सिल्लोड येथील कार्यालयात दस्तनोंदणी (रजिस्ट्री) बंद झाल्याने नागरिकांची अडवणूक सुरु आहे. चिरीमिरी दिल्यास मात्र अवैध प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने नागरिकांची कोंडी होत आहे.चिरीमिरी न दिलेल्यांची कामे रखडली असून दलाल, जमीन खरेदी विक्री करणाऱ्या माफियांची मात्र चांदी होत आहे.शहरातील काही सर्व्हे नंबरमध्ये ग्रीनझोन असताना नागरिकांची फसवणूक करून अवैधरित्या केली जाणारी प्लॉटची खरेदीविक्री बंद करावी, अशा सूचना व लेखी पत्र सिल्लोड येथील तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सहायक दुय्यम निबंधक चटलावार यांना दिल्याने सिल्लोड शहरात खळबळ उडाली आहे.गेल्या महिन्यापासून दस्तनोंदणी करणे थांबविल्याने जनतेवर अन्याय तर होत आहे शिवाय शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी जनता मालमत्ता विक्रीस काढतात, तसेच पैशांची अत्यंत आवश्यकता असल्यानेच कोणीही मालमत्ता विक्रीस काढतो. सदर मालमत्तेची जोपर्यंत नोंदणीकृत खरेदी होत नाही, तोपर्यंत आर्थिक व्यवहार पूर्ण होत नाही. एकीकडे सरकार सर्वांना घरे मिळावी, या हेतूने घरकुल योजना राबवत आहे आणि त्यासाठी गायरान जमिन मालकीची करत आहे, मात्र येथे खरेदी खत होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, असे विनोद मंडलेचा यांनी सांगितले.दुस्तनोंदणी तात्काळ सुरु करण्याची मागणीप्लॉट, सहान जागा, बांधलेली घरे यांची दस्तनोंदणी गेल्या १ महिन्यापासून बंद आहे. ती तात्काळ सुरू करून जनतेची होणारी पिळवणूक थांबवावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे शहराध्यक्ष विनोद मंडलेचा, शेख वसीम बागवान, हाजी शेख जाकेर, मोतीराम मिसाळ, मुरलीधर हिरे, शेख मुख्तार, मनोज साळवे, नईम रशीद खान, यकीन शहा, सय्यद कदीर, बाळासाहेब बागूल, प्रकाश तोताराम पाटील, इलियासखा, अ. वहाब यांनी सहायक दुय्यम निबंधक यांना दिले आहे.काय आहे तहसीलदारांच्या पत्रात?सिल्लोड शहरात सर्व्हे नंबर २६७, २९१, ३४६,१९, १८, ९, ७, १३, ४२१, ४३०, ७० मधील काही मालमत्ताधारकांनी अवैध प्लॉटिंग पाडून ग्रीन झोनमधील जमीन एनए ४५ दंडाची रक्कम भरणा न करता गोरगरीब जनतेची फसवणूक करणे सुरु केल्याच्या तक्रारी आल्याने अशा प्लॉटची खरेदी करू नये, असे पत्र सहायक दुय्यम निबंधकांना दिले आहे.-रामेश्वर गोरे तहसीलदार सिल्लोड.केवळ अवैध रजिस्ट्री बंद आहेनियमात बसणाºया सर्व रजिस्ट्री व ८ अ ४४ ची रजिस्ट्री सुरू आहे. ग्रीन झोनमधील अवैधरित्या होणारी प्लॉटची खरेदी -विक्री तहसीलदारांच्या पत्रावरून थांबविण्यात आली आहे. येथे कोणतेच गैरव्यवहार होत नाही. आरोप चुकीचे आहेत.-चटलावार, सहायक दुय्यम निबंधक,सिल्लोड शहरात प्लॉटींगचा गोरखधंदासिल्लोड शहरात जमीन, प्लॉट, खरेदी -विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेची फसवणूक करून काही माफिया ग्रीन झोनमधील प्लॉट, नागरिकांना विक्री करीत आहेत. संबंधित विभागाला चिरीमिरी दिल्यावर अजूनही खरेदी -विक्रीचे व्यवहार होत आहेत. यासाठी कार्यालयासमोर दलालांनी गर्दी केली आहे. नागरिकांची पिळवणूक करण्यासाठी रजिस्ट्री कार्यालयात खास एक व्यक्ती नेमण्यात आला आहे. एका व्यवहाराचे १० ते १५ हजार रुपये जास्तीचे दिल्यास सर्व अलबेल असल्याचे भासवून व्यवहार होत आहे. कामे केवळ गोरगरिबांची रखडली आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारRevenue Departmentमहसूल विभाग