मानवत : मराठा समाजाला आघाडी शासनाने दिलेले आरक्षण रद्द झाल्याने समाजाच्या वतीने शैक्षणिक बंद पुकारण्यात आला. मानवत शहरासह ग्रामीण भागातही १५ नोव्हेंबर रोजी बंद पाळण्यात आला. संभाजी ब्रिगेडने तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, आरक्षणाच्या बाजूने सरकार आपले मत मांडण्यात कमी पडले. परिणामी न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे सरकारने ताबडतोब मराठा आरक्षणाठी आपली भूमिका पार पाडावी व मराठा समाजासाठी आरक्षण लागू करावे. यासाठी १५ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय शैक्षणिक बंद पाळण्यात आला आणि शासनाचा निषेधही करण्यात आला. त्याच बरोबर मराठा समाजाचे आरक्षण समाजास न मिळाल्यास यापुढेही लोकशाही मार्गाने हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष वैजनाथ महिपाल, सचिव गोविंद घांडगे, कार्याध्यक्ष बालाजी कापसे यांच्यासह आकाश वायचळ, गोविंद बारहाते, उद्धव सुरवसे, नितीन काळे, मनोहर काळे, अक्षय कदम, बालासाहेब पौळ, सचिन जगताप, गोविंद भोंबे, गोपाळ होगे, शाम शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पाथरीतही शैक्षणिक बंदपाथरी :मराठा समाजाला देण्यात आलेले शैक्षणिक व सामाजिक आरक्षण स्थगित झाल्यानंतर पाथरीत शासनाच्या निषेधार्थ विविध संघटनांंनी १५ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक बंद पुकारला होता. या बंदमध्ये शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला. राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. मुंंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजास दिलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशास स्थगिती दिल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप सकारने न्यायालयात ठोस भूमिका न घेतल्यामुळे या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याची भावना मराठा समाजामध्ये दिसून येऊ लागली आहे. पाथरी शहरातील सर्व मराठा संघटना, शिवसेना, मुस्लीम संघटना, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी सेना, छावा संघटनेच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शासनाच्या निषेधार्थ शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आहवानाला प्रतिसाद शाळा, महाविद्यालय बंद ठेऊन शैक्षणिक बंद पाळण्यात आला. या आंदोलनासाठी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश ढगे, तालुकाप्रमुख रविंद्र धर्मे, मुंजाभाऊ कोल्हे, रामचंद्र आमले, दीपक टेंगसे, छावाचे बापू कोल्हे, नितीन आमले, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे रामेश्वर शिंदे, तुकाराम पौळ, युवराज घोगरे, संभाजी ब्रिगेडचे जगदीश कोल्हे, बाळासाहेब झिंजान, गोवर्धन गोंगे, विजय कोल्हे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
‘त्या’ निर्णयाच्या विरोधात बंद
By admin | Published: November 15, 2014 11:42 PM