शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 1:25 PM

Heavy RainFall in Marathawada : ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १९ टक्के पंचनामे पूर्ण झाले २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पथके

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ( Heavy RainFall in Marathawada) २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची या महिन्याच्या १४ तारखेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम विभागीय पातळीवर सुरू असून, आजवर १९ टक्के शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत महसूल, कृषी विभागाची पथके पोहोचली आहेत. ( Cloudburst at 42 places in Marathwada; Massive loss of 20 lakh 39 thousand farmers) 

हेक्टरचा विचार केला तर २५ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनाम्याअंती किती हेक्टवरील पिके वाया गेली, त्याचा अहवाल समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले. १ सप्टेंबरपासून आजवर कमी-अधिक प्रमाणात विभागात अतिवृष्टी झाली. सुमारे २५० मंडळांत पावसाने दाणादाण उडवून दिली. यात कापूस, मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक वाया गेले. त्याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे.

४२ ठिकाणी ढगफुटी; मराठवाडा हादरला७ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. मराठवाड्यात सर्वाधिक ४२ हून अधिक ठिकाणी असा पाऊस एकाच दिवसात झाला. या पावसामुळे जीवितहानी झाली, पशुधनाचे नुकसान झाले. शिवाय घरांची पडझड, रस्ते, पूल खचले. मराठवाड्यात लाखो एकर शेतीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले. कापूस, तूर, मूग, मका, सोयाबीन, बाजरीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची आगाऊ सूचना मिळावी, यासाठी डॉप्लर रडार विभागात बसविणे आवश्यक आहे. वित्त व जीवितहानी तसेच शेतीचे नुकसान टाळण्यासाठी डॉप्लर रडार मराठवाड्यात तातडीने बसविणे गरज असल्याचे हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

जिल्हा-----बाधित शेतकरी---- झालेले पंचनामे---टक्केवारी

औरंगाबाद-- ३२६९३५ ------ २९३२८-------१७ टक्के

जालना----२६१२९८------ २६०६३-------११ टक्के

परभणी---२२२७९४ ------ २२९४४-------१४ टक्के

हिंगोली---११५०० ------ १०२५--------११ टक्के

नांदेड----४५१५८८------- २९६७२-------०७ टक्के

बीड-----७३७२२५----- १५०६६०------२९ टक्के

लातूर----८४९० ------ २५७४--------४० टक्के

उस्मानानाबाद--१९२२८------ ८४६०--------८० टक्के

एकूण -----२०३९६८८-----२७०७२७--------१८ टक्के

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद