औरंगाबाद : ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून केलेल्या आरोपींना सत्र न्यायालयाने आज आजन्म कारावास व अडीज लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघा आरोपींनी विचारपूर्वक योजना आखून थंड डोक्याने (कोल्ड ब्लडेड) वर्धनचा खून केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांनुसार हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ गुन्हा असल्यामुळे आरोपींना मरेपर्यंत ‘फाशी’ देण्याची विनंती अभियोग पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मंगळवारी (दि.११ डिसेंबर) केली होती.
१ सीसीटीव्हींचे फुटेज ठरले महत्त्वाचा पुरावालाल रंगाच्या उघड्या स्पोर्टस् कारमधून आरोपींनी वर्धनला टिळकनगर येथून दौलताबादच्या घाटात नेले. तेथे त्याचा रुमालाने गळा आवळून खून केल्यानंतर त्याला कारच्या डिक्कीत टाकून परत श्रेयनगरमध्ये आणले आणि तेथील नाल्यात वर्धनचा मृतदेह त्यांनी फेकला होता. टिळकनगर येथून वर्धनला नेत असताना मार्गावरील सीसीटीव्हीत कारमध्ये वर्धन आणि आरोपी बसलेले दिसत होते, तर परत येण्याच्या आरोपींच्या प्रवासादरम्यान ते दोघेच कारमध्ये असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने चित्रित केले होते. या तांत्रिक पुराव्याद्वारे आरोपी वर्धनला कारमधून नेत असल्याचे आणि परत येताना त्यांच्यासोबत वर्धन नसल्याचे सिद्ध झाले.
खंडणीची मागणी करणाऱ्या चिठ्ठीवरून पकडले आरोपीपाच कोटी रुपयांची खंडणी पुणे रस्त्यावरील स्माईल स्टोन ढाब्याजवळ आणून द्या,अशी चिठ्ठीच आरोपी अभिलाषने वर्धनच्या घरात टाक ली होती. त्यावेळी सोसायटीत राहणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत खडके, चंद्रकांत खंदारे, शांतीलाल बारवाल यांना अभिलाष आणि शाम मगरे यांच्यावर संशय आला. त्यांनी लगेच याबाबतची माहिती जवाहरनगर पोलिसांना कळविली. खडके यांनी अभिलाषकडे वर्धनविषयी विचारपूस करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. काही वेळात तेथे दाखल झालेल्या जवाहरनगर पोलिसांच्या मदतीने अभिलाष आणि शाम यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत वर्धनला दौलताबाद घाटात नेत रुमालाने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह श्रेयनगरमधील नाल्यात फेकल्याचे सांगितले.
श्रेयनगर येथील नाल्यात फेकला मृतदेहआरोपीने दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस त्याला सोबत घेऊन श्रेयनगर येथील नाल्याकडे गेले तेव्हा त्याने ज्या ठिकाणी वर्धनचा मृतदेह फेकला ती जागा दाखविली. तेथे नाल्यात निपचित पडलेल्या वर्धनचा मृतदेह पोलिसांच्या नजरेस पडला. पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, निरीक्षक मधुकर सावंत आणि गुन्हेशाखेच्या पोलिसांनी पंचनामा करून नाल्यातून मृतदेह बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल केला. तेथील डॉक्टरांनी वर्धनला तपासून मृत घोषित केले.