शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

विद्यापीठातील स्पॉट ॲडमिशनलाही विद्यार्थ्यांचा थंड प्रतिसाद

By राम शिनगारे | Published: August 03, 2024 12:13 PM

किचकट अर्ज प्रक्रियेसह असहकार्याचा मोठा परिणाम प्रवेश संख्येवर झाल्याची माहिती

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना स्पॉट ॲडमिशनच्या दिवशीही काही अपवादात्मक विभाग सोडता उर्वरित विभागांमध्ये थंड प्रतिसाद मिळाला आहे. संगणकशास्त्र, रसायनशास्त्रासह इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर विभागांमध्ये पूर्ण भरल्या गेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे आकडेवारी देण्यास टाळाटाळ केली.

विद्यापीठात अडीच महिन्यांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सीईटीनंतर जाहीर केलेल्या दोन फेऱ्यांमध्ये अवघे ४३९ प्रवेश झाले होते. अनेक नामांकित विभागाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. त्या पार्श्वभूमीवर स्पॉट प्रवेशाला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, विद्यापीठातील काही विभागवगळता इतर विभागांमधील प्रवेशाला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. विज्ञान विद्याशाखेतील काही विभागांमधील प्रवेश पूर्ण क्षमतेने झाले आहेत. मात्र, अर्ध्यांपेक्षा अधिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा कमी जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. स्पॉट ॲडमिशनच्या संख्येची माहिती विद्यापीठ प्रशासनाने देण्यास असमर्थता दर्शविली.

दहा ते बारा पानांचा ऑनलाइन अर्जविद्यापीठाने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसतानाही सीईटीद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यानंतर उपलब्ध संख्यापेक्षाही कमी नोंदणी असतानाही दोन प्रवेश फेऱ्या जाहीर केल्या. त्यानंतरही २ ऑगस्ट रोजी स्पॉट ॲडमिशन जाहीर केले आहे. स्पॉट ॲडमिशनला येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली होती. वेगवेगळी कागदपत्रे अपलोड करण्यासह दहा ते बारा पानांची ऑनलाइन माहिती भरणे अनिवार्य होते. त्यामुळे जे विद्यार्थी प्रवेशाला आले त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागल्याची परिस्थिती 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आली.

विद्यापीठ बंद पाडण्याचा डाव; प्रक्रियेची चौकशी कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या विद्यापीठात पुरोगामी विचार जोपासला जातो. त्यामुळे उजव्या विचारसणीच्या सत्ताधाऱ्यांचा हे विद्यापीठ बंद पाडण्याचा डाव आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेऊ नयेत, यासाठीच किचकट प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्यही केले गेले नाही. या प्रवेश प्रक्रियेत दोषी असलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन अधिसभा सदस्य प्रा. हरिदास ऊर्फ बंडू सोमंवशी यांनी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिले. या निवेदनावर प्रा. सोमवंशी यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे दिग्विजय शिंदे, सादिक शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण