औरंगाबाद : उत्तरकेडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांनी शहरातील किमान तापमानात सोमवारी एकाच दिवसात ३ अंशाने घट झाली आणि यंदाच्या हिवाळ्यातील निच्चांकी किमान तापमानाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे.
हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात सतत चढउतार होत असल्याचा अनुभव शहरवासियांना येत आहे. शहरात गेल्या ५ दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत गेला आणि थंडीत वाढ होत गेली. गार वाऱ्यामुळे दुपारच्या वेळीही बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे दुपारी उन्हात उभे राहून ऊब घेताना नागरिक दिसत होते. थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर निघणे अवघड होत आहे. थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. आगामी दिवसांत हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही खाली किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले, आगामी दिवसांत ''रेकॉर्ड ब्रेक'' थंडी वाढणार आहे. मराठवाडा हा यंदा ढगफुटींचा प्रदेश बनला आहे. परिणामी, जमिनीत पाण्याचे प्रमाण तसेच हवेतील आर्द्रता वाढलेली आहे. उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे वाहत आहेत. यामुळे महाराष्ट्रात हाडे गोठवणारी थंडी निश्चितपणे जाणवणार आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया, ह्रदयरोगी, मधुमेही, अस्थमा आदी रुग्णांनी थंडीपासून बचावासाठी अत्यावश्यक काळजी व वेळेवर सुयोग्य औषधोपचार तसेच आहार-विहार घेणे आवश्यक आहे.असा घसरला तापमानाचा पारा
तारीख - किमान तापमान (अंश सेल्सिअस)१५ डिसेंबर - १६.६१६ डिसेंबर - १६.२१७ डिसेंबर - १६.४१८ डिसेंबर - १५.९१९ डिसेंबर - १५.०२० डिसेंबर - १२.४२१ डिसेंबर - ९.४
आगामी दिवसांतील किमान तापमानाचा अंदाजतारीख- किमान तापमान (अंश सेल्सिअस)२२ डिसेंबर - १०.०२३ डिसेंबर- ११.०२४ डिसेंबर - १२.०२५ डिसेंबर- १२.०२६ डिसेंबर - १२.०२७ डिसेंबर - १२.०