शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

सगेसोयरे, इष्टमित्रांसह मतदानासाठी यायचं हं! मतदार जागृती पत्रिका व्हायरल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 9, 2024 18:48 IST

चि. मतदार व चि. सौ. कां. लोकशाही यांची लग्नपत्रिका व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर सध्या एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. ती निमंत्रण पत्रिका ‘मतदार जागृती पत्रिका’ आहे. यावर रील, शॉर्ट्स होत आहेत. रील शॉर्ट्समुळे ही पत्रिका अधिकच व्हायरल होत आहे. चि. मतदार व चि. सौ. कां लोकशाही यांच्या शुभविवाहाचीही पत्रिका नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय आहे.

आवाहनाला लग्नपत्रिकेचे स्वरूपसंविधानाने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा मतदानासाठी यावे, असे मतदारांना आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी या आवाहनाला लग्नपत्रिकेचे स्वरूप देण्यात आले आहे.

आग्रहाचे निमंत्रणपत्रिकेवर सर्वांत वरील बाजूस कुलदेवता प्रसन्न लिहिले जाते. तिथे ‘मी प्रथमत: व अंतिमत: भारतीय’ असा मायना लिहिला आहे. त्याखाली ‘आग्रहाचे निमंत्रण’ ठळक अक्षरात आहे. श्री./ सौ.रा. रा. मतदाता १०८ औरंगाबाद पश्चिम यादी भाग ९९. चि. मतदार (भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव) व चि. सौ. कां. लोकशाही (भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या) यांचा शुभविवाह, ही वधू-वरांची नावे आहेत.

तारीख व शुभमुहूर्तही ठरलासोमवार दि.१३ मे २०२४ रोजी, सकाळी ७ ते सायं. ५ या शुभ मुहूर्तावर लोकसभा - २०२४च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी हेची निमंत्रण अगत्याचे..

मतदान करायला यायचं हं...पत्रिकेवर आपले विनीत म्हणून आम्ही भारताचे लोक असे नमूद करण्यात आले आहे. तसेच वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं हं... आमच्याशिवाय तर मज्जाच नाही.. कु. निळीशाई व चि. ई. व्ही. एम... असे मजेशीर वाक्य लिहिण्यात आले आहे.

आहेर आणि रिटर्न गिफ्टमतदार जनजागृती पत्रिकेत सर्वांत शेवटी ‘टीप’ लिहिण्यात आली आहे. हीच ‘टीप’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. टीप : आपले मतदान हाच आमचा आहेर अन् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट. हे वाक्य लक्ष वेधून घेत आहे.

मै भारत हूं, भारत है मुझ में ही मतदार जागरूकता पत्रिकेवर मतदान केंद्र : न्यू इंग्लिश हायस्कूल, आयप्पा मंदिर, बीड बायपास देण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर रील्स व्हायरल झाली. त्यात ‘भारत आहे, भारत माझाच आहे, मी ताकद आहे ताकद माझ्यात आहे, मतदान करू चला भारतासाठी’ असे गाणेही मतदारप्रिय होत आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४