शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

दिलासा ! शहराची कोरोना मृत्यूवर मात; ग्रामीण भागातील एका रुग्णाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 11:58 AM

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात सध्या ६५० रुग्णांवर सुरू उपचार

ठळक मुद्देबुधवारी शहरात १९ तर ‘ग्रामीण’मध्ये ७१ रुग्णांची वाढ

औरंगाबाद : शहराने बुधवारी आठवडाभरात दुसऱ्यांदा कोरोना मृत्यूवर मात केली. दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ग्रामीण भागातील एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाच्या ९० नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील १९, तर ग्रामीण भागातील ७१ रुग्णांचा समावेश आहे. ( corona virus in Aurangabad ) 

जिल्ह्यात सध्या ६५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात चार महिन्यांनंतर २५ जून रोजी शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. आता आठवड्याभरात दुसऱ्यांदा बुधवारी शहरात एकही कोरोनाबळी गेला नाही. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार २०८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार १३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३४२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २५ आणि ग्रामीण भागातील ८५ अशा ११० रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना अडगाव, कन्नड येथील ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद १, किर्ती हाऊसिंग सोसायटी, एन-८ येथे १, जयभवानीनगर १, टीव्ही सेंटर १, पैठण गेट १, सिडको १, पडेगाव १, पानचक्की १, अन्य ११.

ग्रामीण भागातील रुग्णऔरंगाबाद तालुक्यात २० फुलंब्री तालुक्यात एक, गंगापूर तालुक्यात १५, कन्नड तालुक्यात ३, वैजापूर तालुक्यात २३, पैठण तालुक्यात ९ रुग्णांची वाढ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद