औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट राहिली. दिवसभरात ५२ नव्या रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या १०८ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,९८४ एवढी झाली आहे. यातील ४१,९७१ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत तर १,१५९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ८५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५२ रुग्णांत मनपा हद्दीतील ४१, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८९ आणि ग्रामीण भागातील १९ अशा १०८ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना शहरातील धावनी मोहल्ल्यातील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण :एन-२, सिडको २, रेल्वेस्टेशन परिसर ३, सिडको महानगर १, इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी ४, उत्तमनगर १, अशोकनगर ३, सिडको बसस्टँड परिसर १, राधाकृष्ण मंदिराजवळ, क्रांतीचौक १, हडको परिसर १, अन्य २४
ग्रामीण भागातील रुग्ण : सिल्लोड पोलीस स्टेशन परिसर १, अन्य १०