शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दिलासादायक ! पासपोर्ट कार्यालये ८ महिन्यांनंतर सुरू; मराठवाड्यातील नागरिकांची गैरसोय थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 5:58 PM

पासपोर्ट घेण्यासाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयातून संबंधितांना ‘ऑनलाईन अपॉइंटमेंट’ दिली जाते.

ठळक मुद्देमागील ८ महिन्यांत लोकांना पासपोर्टसाठी नाशिक आणि मुंबईला जावे लागत होते. १ डिसेंबरपासून विभागातील १० पासपोर्ट कार्यालये सुरू

- प्रभुदास पाटोळे 

औरंगाबाद  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर २३ मार्चपासून  बंद असलेले औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय तब्बल ८ महिन्यानंतर १ डिसेंबरपासून अखेर सुरू झाले. त्यासोबतच  हिंगोली वगळता मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांसह जळगाव ,भुसावळ  आणि धुळे येथील पासपोर्ट कार्यालये अशी १० कार्यालयेसुद्धा आजपासून सुरु झाली आहेत.

सिनियर पासपोर्ट असिस्टंट इलाही तांबोळी यांच्यासह औरंगाबाद येथील टपाल खात्याचे ३ कर्मचारी मंगळवारपासून औरंगाबादेत रुजू  झाले. पासपोर्ट घेण्यासाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयातून संबंधितांना ‘’ऑनलाईन अपॉइंटमेंट’’ दिली जाते. १ डिसेंबर रोजी १० व्यक्तींना ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाली आहे. यापैकी अनामिका बाबुराव कांबळे (रा. न्यू श्रेयनगर) यांना आज पहिली अपॉइंटमेंट मिळाली होती. त्यांच्यासह त्यांच्या दोन बहिणी अश्विनी आणि स्नेहा तसेच आई वंदना बाबुराव कांबळे आणि अनुज अरुण टाकळकर (रा.  उस्मानपुरा)  या ५ व्यक्ती पासपोर्ट कार्यालयात हजर होत्या. एकावेळी एकाच व्यक्तीची थर्मल गनद्वारे तपासणी करून, मास्क असेल तरच प्रवेश दिला जात होता. बाहेर प्रतीक्षेत असलेल्या इतर व्यक्तींना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून एका बाकावर एकाच व्यक्तीला  बसविण्यात आले होते. पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील संगणक कॅमेरे व इतर यंत्रसामग्रीची चाचणी घेऊन आजपासून काम सुरू केले आहे. मागील ८ महिन्यांत लोकांना पासपोर्टसाठी नाशिक आणि मुंबईला जावे लागत होते. 

विभागातील १० पासपोर्ट कार्यालये सुरूऔरंगाबादसह नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना, जळगाव, लातूर, भुसावळ आणि धुळे अशी १० पासपोर्ट कार्यालये १ डिसेंबरपासून सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाpassportपासपोर्टtourismपर्यटन