भाजप नेते हरिभाऊ बागडे, विद्यमान चेअरमन नितीन पाटील यांच्या पॅनेलकडून वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
परदेशी यांनी बिगर शेती संस्था व वि.जा.भ.ज. वि. मा.प्र या दोन मतदारसंघांतून संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीच्या मैदानात ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार यांचा फैसला येत्या १० मार्चल होईल. दिवंगत माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्याशी माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी डॉ. परदेशी यांच्या विजयासाठी हातभार लावला होता. बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून रामकृष्णबाबांचे थोरले सुपुत्र अप्पासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच मतदारसंघातून विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर, ज्ञानेश्वर जगताप, ॲड. प्रमोद जगताप आदींनी अर्ज दाखल केलेले आहेत. या मतदारसंघासाठी तालुक्यातील ११५ सहकारी संस्थेचे मतदार असल्याने ही निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात यश मिळविण्याकरिता हरिभाऊ बागडे यांची मदार डॉ. दिनेश परदेशी यांच्यावर अधिक असल्याची चर्चा आहे. पैठण, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, खुलताबाद, औरंगाबाद या तालुक्यातील नेतेमंडळींनी परदेशी यांना सहाय्य करण्याची तयारी दर्शविल्यामुळे त्यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रथमच सहभाग घेतला आहे.
तालुक्यातून जवळपास १५ जणांनी विविध मतदारसंघांतून बँकेच्या संचालकपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
फोटो : माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी