शिवाजी नागरीचे चेअरमन रवींद्र काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी त्यांच्या हस्ते माेजक्या संचालकांच्या उपस्थितीत मोबाइल बँकिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेमुळे बँकेच्या दीड लाख ग्राहकांना कोरोना काळात घरी बसून आपले व्यवहार करता येणार आहेत. दरम्यान, काळे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदर येथे लसीकरण शिबिरासाठी मंडप व्यवस्था करण्यात आली होती. तसेच लस घेतलेल्या नागरिकांस वाफ घेण्याचे मशीन काळे यांच्या वतीने भेट देण्यात आले. शिवाजी बँकेच्या वतीने सध्या विविध गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बँकेने १६५ गावांत रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप व सॅनिटायझर फवारणी केली होती. यावेळी भाऊसाहेब औटे, एन.व्ही. शर्मा, हरिपंडित गोसावी, भिकाजी आठवले, पाशा धांडे, दशरथ सोनवणे, सोमनाथ जाधव, रमेश खांडेकर, पृथ्वीराज चौहान, सुनील जाधव, फाजल टेकडी, नगरसेवक बजरंग लिंबोरे, गोवर्धन टाक, स्वदेश पांडे, राजू टेकाळे आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेचे सीईओ ई. आय. पठाण, डेप्युटी सीईओ गणपत म्हस्के, व्यवस्थापक संतोष राऊत, सुभाष काळे, विजय पोशनगीर, रत्नदीप मुळे, फौजदार जाधव आदींनी परिश्रम घेतले.
फोटो : शिवाजी नागरी बँकेच्या मोबाइल सेवेचा प्रारंभ करताना बँकेचे चेअरम रवींद्र काळे व इतर संचालक.
270421\1619529000695_1.jpg
शिवाजी नागरी बॅंकेच्या मोबाईल सेवेचा प्रारंभ करताना बँकेचे चेअरम रविंद्र काळे व इतर संचालक.