औरंगाबाद : मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात नारायणा आयआयटी आणि पीएमटी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
या स्पर्धा परीक्षा शालेय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवितात. त्यामुळेच या परीक्षा देण्यासाठी नारायणा येथे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते, असे डॉ. एम. एफ. मलिक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित सत्कार सोहळ्यात सांगितले.
नारायणा फाऊंडेशन कोर्समधील वरद गाडेकर, वरद ठोंबरे, अमेया पाथ्रीकर, सागर सुस्ते हे ४ विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरले असून ५३ विद्यार्थ्यांना मेरिट प्रमाणपत्र मिळाले. नारायणा येथे ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप कम ॲडमिशन टेस्ट २१ मार्चला तर दोन वर्षीय जेईई व नीट अभ्यासक्रम स्कॉलरशिप टेस्ट ४ एप्रिलला होणार असल्याचे प्रा. विशाल लदनिया यांनी सांगितले.