औ---------- : जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी कृष्णराव जाधव यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव सागर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी झालेल्या रक्तदान शिबिरात १५३ जणांनी सहभाग घेतला, तसेच अयोध्येतील राममंदिरासाठी २१ हजारांची व सह्याद्री प्रतिष्ठानला ५५०० रुपयांची भेट देण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यात समृद्धी गायकवाड, जीनत अयूब शहा, अर्णव गिते, साक्षी शिंदे यांनी यश मिळविले. अभिवादनप्रसंगी माजी आ. नामदेव पवार, नगराध्यक्ष संतोष कोल्हे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, सभापती प्रकाश घुले, अशोक मगर, तेजराव नीळ, उदय जाधव, किशोर वाळुंजे, नगरसेवक काकासाहेब ठोकळ, उद्योजक संजय भारुका, मिर्झा बेग, सादिक मलिक, प्रा. रंगनाथ लहाने, प्रा. संतोष मतसागर, प्रा. संजय गायकवाड, बाळासाहेब निकम यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी जिजामाता परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रवीण दाभाडे यांनी केले. प्रदीप सनान्से यांनी आभार मानले.
वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:07 AM