कोतवालपुऱ्यात मोकाट
कुत्र्यांचा वाढला त्रास
औरंगाबाद : शहरातील कोतवालपुरा येथे गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मोकाट कुत्रे अचानक रस्त्याने जाणाऱ्या पादचारी, दुचाकीस्वारांच्या मागे लागतात. त्यातून अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे मनपाने या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
बंद सिग्नलमुळे
वाहतुकीची कोंडी
औरंगाबाद : ज्युबली पार्क येथील वाहतूक सिग्नल गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे याठिकाणी वेळाेवेळी वाहतूक कोंडी निर्माण होते. येथून घाटीत जाणाऱ्या रुग्णवाहिकांची ये-जा होते. या रुग्णवाहिकांनाही त्यामुळे अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे.
जप्त केलेली वाहने
महामंडळाच्या जागेत
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने कारवाई करून जप्त केलेल्या वाहनांनी सध्या कार्यालयाची जागा भरून गेली आहे. परिणामी, याठिकाणी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या जागेत जप्त केलेली वाहने उभी करण्याची वेळ आरटीओ कार्यालयावर येत आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
औरंगाबाद : आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक रस्त्यावरील दुभाजकात जागोजागी कचरा टाकण्यात आलेला आहे. दुभाजकात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे फलक आहेत. तरीही सर्रास कचरा फेकला जात आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.