औरंगाबाद : बदनापूर - करमाडदरम्यान झालेल्या अपघाताची सिकंदराबाद येथील कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस)यांच्याकडून सोमवारी औरंगाबाद रेलवेस्टेशनवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अपघातातील चालकाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्याच वेळेत रेल्वेच्या दोन ट्रायल घेण्यात आल्याचे समजते. त्यातून अपघात नेमका कसा घडला, हे जाणून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली
चौकशीसाठी जालना ते औरंगाबाददरम्यानचे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. या चौकशीतून या अपघातास कोण जबाबदार आहे, हे समोर येणार आहे. सिकंदराबाद विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त राम कृपाल यांच्याकडून ही चौकशी करण्यात येत आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ते सामान्य नागरिक आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी या घटनेची चौकशी आहेत. सामान्य नागरिक तसेच ज्यांकडे या अपघाताविषयी काही पुरावा आहे, त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत आहे.