वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने रांजणगाव, बजाजनगर परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, सातत्याचा अभाव असल्याने कारवाईला न जुमानता व्यवसायिकांकडून सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याचा वापर केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पर्यावरणाला घातक ठरणाºया प्लास्टिक उत्पादनासह वापरावर शासनाने बंदी घातली आहे. बंदी असतानाही विविध व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरु असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने धडक मोहीम हाती घेवून कारवाई सुरु केली आहे. महिनाभरापूर्वी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीवर छापा मारुन जवळपास तीन कोटी रुपये किमतीचे प्लास्टिक जप्त करुन कंपनीला सील ठोकले होेते.
त्यानंतर २१ आॅक्टोबर रोजी रांजणगाव तर २२ आॅक्टोबर रोजी बजाजनगर परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी हेमंत कुलकर्णी व गजानन खडकीकर यांच्या पथकाने प्लास्टिक वापरणाºया विक्रेत्यावर कारवाई करत जवळपास ७५ हजारांचा दंड वसूल केला. परंतू पथकाकडून केल्या जाणाºया कारवाईत सातत्य नाही. त्यामुळे कारवाईचा विक्रेत्यांवर वचक राहिला नाही. पथकाची पाठ फिरताच विके्र त्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा पुन्हा वापर केला जात आहे.
दिवाळी सणामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. बजाजनगरसह रांजणगाव, पंढरपूर, सिडको, वाळूज आदी परिसरात किराणा, कपडे, भाजीपाला आदी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना होलसेल विक्रेत्यासह किरकोळ विक्रेत्यांकडूनही वापरावर बंदी असलेल्या प्लास्टिक पिशवीत माल दिला जात असल्याचे चित्र वाळूज महानगर परिसरात दिसून येत आहे.