लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि एमआयएम, काँग्रेसकडून हाय व्होल्टेज ड्रामा रंगविण्यात आला होता. सर्वसाधारण सभेत एक मोठा विषय चर्चेला येऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षांनी मिळून हा खटाटोप केला. याचे पडसाद आता हळूहळू उमटण्यास सुरुवात झाली आहे. एमआयएम पक्षाने ‘वंदे मातरम्’ गीताचा अनादर करणाºया नगरसेवकाला नोटीस बजावली. याच पक्षाच्या दोन गोंधळी नगरसेवकांविरुद्ध मनपा प्रशासनाने पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा दिली. पुण्याच्या वंदे मातरम् संघटनेच्या पदाधिकाºयांनी शहरात येऊन दोषी नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली.शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् गीत सुरू असताना एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन, काँग्रेसचे सोहेल शेख बसून होते. दोघांनी वंदे मातरम् या गीताचा अवमान केला, या मुद्यावरून शिवसेना-भाजप सदस्यांनी जोरदार गदारोळ केला. प्रत्युत्तरात एमआयएमनेही घोषणाबाजीचा बिगुल वाजवून तेल ओतण्याचे काम केले. गोंधळ एवढा वाढला की, माईकची तोडफोड, एकमेकांना ढकलून देणे, शिवीगाळ करणे इथपर्यंत मजल पोहोचली होती. हिंदू विरुद्ध मुस्लिम असा सोयीस्करपणे ड्रामा रंगविण्यात आला. कारण या ड्राम्याचे संवादलेखन भाजपच्या एका सदस्याने अगोदरच केले होते. महापौर बापू घडमोडे यांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन, शेख जफर आणि समीना शेख यांना एक दिवसासाठी निलंबित केले. दोषींविरुद्ध पोलीस तक्रार द्यावी असे प्रशासनाला आदेशित केले. महापौरांच्या आदेशानुसार सोमवारी महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या (पान २ वर)
मनपाची ‘त्या’ दोन नगरसेवकांविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:08 AM