शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चिकलठाणा विमानतळासमोर ‘औैरंगाबाद दर्शन’चे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:55 IST

पर्यटकांना औरंगाबाद शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

ठळक मुद्दे५० लाखांचा उपक्रम : सहा महिन्यांपासून जोरदार तयारीदेशी-विदेशी पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार लवकरच होणार लोकार्पण

औरंगाबाद : शहरात दाखल होणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना औरंगाबाद शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. राज्य शासनाने या उपक्रमासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले असून, एमटीडीसी आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने काम करण्यात येत आहे. पंधरा दिवसांत पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर लवकरच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येईल.

दरवर्षी अजिंठा-वेरूळला १५ ते १८ लाख देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. शहरात मकबरा पाहण्यासाठीही १२ ते १५ लाख पर्यटक येतात. दौलताबाद किल्लाही पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतो. येथे ६ लाखांहून अधिक पर्यटक दरवर्षी येतात. औरंगाबाद शहराकडे पर्यटकांचा प्रचंड ओघ असताना त्यांना दर्जेदार सोयीसुविधा अजिबात मिळत नाहीत. मागील काही वर्षांत एमटीडीसीने प्रत्येक पर्यटनस्थळांवर किमान मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यादृष्टीने छोटे-छोटे उपक्रम सुरू केले आहेत.

शहरात अनेक पर्यटक विमानाने येतात. विमानतळावर आल्यानंतर पर्यटकांना कुठे जावे, हे कळत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यादृष्टीने विमानतळासमोर असलेल्या ११२ मीटर लांब आणि ९ मीटर रुंद जागेवर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी राज्य शासनाने ५० लाख रुपयांचा निधीही एमटीडीसीला उपलब्ध करून दिला. तीन वर्षांपूर्वी हा निधी महापालिकेला देण्यात आला.

महापालिकेने निविदा काढण्यासाठी प्रचंड विलंब केला. कंत्राटदार निश्चित झाल्यानंतरही अनेक महिने कामच सुरू झाले नाही. अखेर सहा महिन्यांपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाठपुरावा करून कामाला सुरुवात केली. मागील सहा महिन्यांपासून विविध पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती तयार करण्यात येत होत्या. विमानतळासमोरील जागा स्वच्छ करून दोन्ही गेटच्या बाजूला अजिंठा येथील ‘पद्मपाणी’ची प्रतिकृती उभारण्यात आली. दुसऱ्या बाजूला वेरूळ येथील ‘कैलास स्तंभ’ उभारण्यात आला आहे. मध्यभागी सोनेरी महाल, औरंगाबाद लेणी, पाणचक्की, मकबरा, भडकलगेट, दिल्लीगेट, मकईगेटची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. 

पंधरा दिवसांमध्ये काम पूर्ण होणारमागील सहा महिन्यांपासून अथक परिश्रम घेऊन प्रतिकृती तयार करण्यात आल्या. औरंगाबाद दर्शनसाठी निवडण्यात आलेल्या जागेवर उद्यापासून लॉन बसविण्याचे काम सुरू होणार आहे. पंधरा दिवसांमध्ये काम संपेल, अशी अपेक्षा आहे.-प्रदीप देशपांडे, वास्तुविशारद.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळBibi-ka-Maqbaraबीबी का मकबराmakai gateमकाई गेटsoneri mahalसोनेरी महाल