औरंगाबाद : शहरातील विविध वॉर्डांमध्ये विकासाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना मागील काही वर्षांपासून बिले मिळणे अवघड झाले होते. मागील दोन महिन्यांत मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रशासनाला आर्थिक शिस्त लावून तब्बल १२ कोटी रुपयांची बिले अदा केली. बिलांच्या थकबाकीचा आकडा २५ कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शहरात केलेल्या कामांची मनपाकडून वर्षानुवर्षे बिले मिळत नसल्यामुळे नवी कामे करण्यास कंत्राटदार टाळाटाळ करीत होते. मागील दोन महिन्यांत १२ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. त्यात १८८ कामांचा समावेश आहे. वसुली कमी व शहराच्या वाढत्या व्यापामुळे मनपाची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून खराब आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातही वारंवार कपात करण्यात आली.
मनपा कंत्राटदारांवर मेहरबान
By admin | Published: May 16, 2016 12:12 AM