लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आॅनलाईन प्रक्रियेद्वारे ग्रामस्तरावरील कामकाज सुरळीतरित्या पार पाडणारे आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.ई-ग्रामपंचायत डिजिटल इंडियामधील एक मिशन मोड विकास कार्यक्रम या प्रकल्पांतर्गत संग्राम सुविधा राबविण्यात आली होती. त्याची मर्यादा २०१५ साली राज्यभरात संपली आहे. याचा पुढील भाग म्हणून ग्रामविकास विभागाने माहिती तंत्रज्ञान संचालनालय व केंद्र शासनाद्वारे प्रेरित उपक्रम यांच्या संयुक्त माध्यमातून आपले सररकार सेवा केंद्र सुरू केली आहेत. या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज विविध प्रकारचे संगणकीकृत दाखले, प्रमाणपत्र वितरित करणे, लोकोपयोगी रेल्वे, बस आरक्षण, डीटीएच व बँकींगसह इतर सुविधा देण्याचे काम सोपविण्यात आले आहे. याकरिता संग्राम प्रकल्पातील संगणक परिचालकांना नव्याने जबाबदारी दिली आहे.परंतु त्यातील ४० टक्के संगणक परिचालकांना अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत, त्यांना नियुक्त करून घ्यावे, नायगाव, बिलोली धमार्बाद तालुक्यात कमी केलेले आपले सरकार सेवा केंद्र वाढविण्यात यावे तसेच ग्रामस्तरावर आॅनलाईन कामांसाठी संगणक संच, इंटरनेट व आवश्यक माहिती-लेखे उपलब्ध करून द्यावेत, यासह कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना तत्काळ रूजू करून घ्यावे या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने १० जुलैपासून जिल्हाभरात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील डिकळे, तुळशीराम बैनवाड, विक्रम मोरे, आनंद गोडबोले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संगणक परिचालकांचे सोमवारपासून काम बंद
By admin | Published: July 09, 2017 12:27 AM