लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी भव्य नगरकिर्तन काढण्यात आले़ या नगर किर्तनात हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला़ शहरात ठिकठिकाणी या नगरकिर्तनचे स्वागत करण्यात आले़येथील श्री सचखंड गुरुद्वारात २१ आॅक्टोबर ते २६ आॅक्टोबर या कालावधीत गुरु-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ शहरातील श्री गुरुग्रंथ साहीब भवन येथे विशेष गुरमत समागम घेण्यात आला़ या समागम कार्यक्रमात देशभरातील किर्तनकार सहभागी झाले होते़गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्याचा समारोप गुरुवारी सायंकाळी भव्य नगरकिर्तनाने करण्यात आला़ श्री गुरुग्रंथ साहिब भवन येथुन नगरकिर्तनास प्रारंभ झाला़ या नगरकिर्तनमध्ये संत बाबा बलविंदरसिंघ यांच्यासह गुरु महाराजांचे घोडे, पालखी साहब, निशान साहिब तसेच मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते़ हे नगरकिर्तन रणजीत सिंहजी यात्री निवासमार्गे अबचलनगर कॉलनी- भगतसिंह रोड- जुना मोंढा-गुरु गोविंदसिंघजी मार्ग- हल्लाबोल चौक- वजीराबाद- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे श्री सचखंड गुरुद्वारा पर्यंत निघाले होते़दरम्यान बुधवारी किर्तन दरबारमध्ये भाई सुखवंतसिंहजी हजुरी रागी दरबार, संतबाबा हरीसिंह, ग्यानीभाई रणजीतसिंह आदी सहभागी झाले होते.
गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्याचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:09 AM