औरंगाबाद : ‘मी जिल्हाधिकाऱ्यांचा चालक आहे. त्यांना गरिबांसाठी ६५ हजार रुपयांच्या साड्या खरेदी करायच्या आहेत. तसेच स्वत:साठीही साड्या घ्यायच्या आहेत’, अशी थाप मारून एका भामट्याने कापड व्यापाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात नेले आणि गंडा घातला. हा प्रकार बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजेदरम्यान घडला. या प्रकरणी सिटीचौक ठाण्यात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, समर्थनगरातील सुनील मुथियान यांचे कापड दुकान आहे. सकाळी १० वाजेच्या सुमारास मुथियान हे दुकानात आले. त्याचवेळी एका भामट्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना गोरगरिबांसाठी ६५ हजारांच्या साड्या खरेदी करायच्या आहेत.मी जिल्हाधिकाऱ्यांचा चालक सलीम असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी साड्या पसंत करण्यासाठी या, असे मुथियान यांनी त्या भामट्याला सांगितले. दुपारी आल्यावर भामट्याने त्यांना मॅडमला दीड हजाराची एक साडी तसेच ५०० रुपये द्यायचे आहेत, अशी थाप मारली.याचदरम्यान भामट्याने त्यांना ६0 हजार रुपये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात सोबत नेले. या प्रकरणी मुथियान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाखाली गंडवले
By admin | Published: April 05, 2016 12:28 AM