लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने औरंगाबाद महापालिकेस शंभर कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीत शहरातील ३१ रस्ते गुळगुळीत करण्यात येणार असून, महापालिकेने चार स्वतंत्र निविदाही काढल्या आहेत. सोमवारी या कामांसाठी मनपा आयुक्तांच्या दालनात कंत्राटदारांसोबत प्री बीड मीटिंग घेण्यात आली. यावेळी कंत्राटदारांनी मनपा प्रशासनाने टाकलेल्या अटी व शर्तींना कडाडून विरोध दर्शविला. विशिष्ट कंत्राटदारांना डोळ्यासमोर ठेवून या जाचक अटी टाकल्या आहेत. या अटी शिथिल कराव्यात, अशी मागणीही कंत्राटदारांनी केली.दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने महापालिकेला २४ कोटींचा निधी दिला होता. त्यातही महापालिकेने एका विशिष्ट कंत्राटदाराला डोळ्यासमोर ठेवून अटी-शर्थी तयार केल्या होत्या.
अटी-शर्तींना कडाडून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:54 AM