शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 5:45 PM

आकडेवारीत तफावत असल्याची व्हायरल पोस्ट कन्नड मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यापर्यंत गेली, त्यानंतर...

कन्नड : कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघांतील तळनेर येथील बुथ क्रमांक ८० वर २० नोव्हेंबर रोजी झालेले मतदान आणि दि. २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होताना बुथ निहाय फेरी मधील मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याची एक पोस्ट सोशल मिडियात व्हायरल झाली आहे. पोस्टमधील आकडेवारीमुळे निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याबाबत आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

आकडेवारीत तफावत असल्याची व्हायरल पोस्ट कन्नड मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी जाधव यांना ही बाब कळवली. त्यानंतर जाधव यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या कार्यालयात धाव घेतली. गोरड यांच्याकडे त्यांनी लेखी खुलासा मागितला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी  सांगितले की, आकडेवारी लिहिताना मानवी चूक झाली आहे. आकडा ऐकण्यात चूक होऊन तळनेर बुथ क्रमांक ८० ऐवजी नेवपुर खा. येथील बूथ क्रमांक ८१  वरील संजना जाधव यांना मिळालेली ३२६ मतदानाची आकडेवारी लिहिण्यात  आली. त्यामुळे आकडेवारीची एकूण बेरीज करताना तफावत झाली. ही हस्तलिखित आकडेवारी  उमेदवारांच्या प्रतिनिधींनीची असून त्या आकडेवारीचा संगणकामधील अद्यावत आकडेवारीशी काहीही संबंध नाही, असा खुलासा गोरड यांनी केला.

पोस्टमधील दावा चुकीचाफॉर्म २० व  फॉर्म २१ याची स्वाक्षरीत प्रत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना दिली आहे. त्यामुळे आकडेवारीत कसलाही गोंधळ नाही. सोशल मीडियावर फिरत असलेली पोस्ट चुकीची आहे. ही एक मानवी चूक आहे.- संतोष गोरड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी 

तक्रार दाखल करणारमतमोजणी दरम्यान उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी लिहिलेली आकडेवारी किंवा मतमोजणी करणारे  कर्मचारी यांच्याकडून चूक कशी होऊ शकते. याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद मागणार.- हर्षवर्धन जाधव, अपक्ष उमेदवार

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kannad-acकन्नडmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव