हिंगोली : शहरातील तापडीया ईस्टेटमधील रस्ते विद्युतीकरण व खुले भूखंड नगर पालिकेकडे हस्तांतरण झाले आहेत किंवा नाही याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे हस्तांतरणाबाबत नगरपालिकेने लेखी स्वरूपात माहिती द्यावी अशी मागणी रहिवाशांनी मुख्याधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.येथील हस्तांतरण पालिकेकडे झाले असेल तर तापडीया इस्टेट परिसरातील रस्ते व नाल्यांची कामे होणे अपेक्षित आहे. परंतु यापुर्वी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारचे दुरूस्तीचे कामे करण्यात आली नाहीत.त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये सदरील विषयाबाबत हस्तांतरण झाले किंवा नाही, असा येथी रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंबधी पालिकेने येथील रहिवाशांना हस्तांतरणाचा मुद्दा लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर आशिष पोरवाल, माधव कोरडे, मधुर भन्साळी यांच्यासह रहिवाशांच्या स्वाक्षºया आहेत.
हस्तांतरणाचा संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:28 AM