औरंगाबाद : भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसने गुरुवारी काढलेल्या रॅलीतील बैलगाडी, सायकल,उंट आणि घोड्यांनी लक्ष वेधून घेतले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीस प्रारंभ झाला. आम आदमी के सन्मान मे; कॉंग्रेस मैदान मे, पेट्रोल -डिझेल, गॅसचे दर कमी करा, वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, सोनीया गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या.कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, मराठवाडा समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, माजी राज्यमंत्री अनील पटेल, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरोज मसलगे, शहर महिला अध्यक्षा सीमा थोरात आदींनी या रॅलीचे नेतृत्व केले.
रामूकाका शेळके, भाऊसाहेब जगताप, रवींद्र काळे, अतिश पितळे, बबन डिडोरे, सय्यद अक्रम,नीलेश आंबेवाडीकर, मोईन हर्सूलकर, जयप्रकाश नारनवरे, योगेश मसलगे, इक्बाल सिंग गिल, मुदस्सर अन्सारी, मोहित जाधव, सुभाष देवकर, सुमेध निमगावकर, एम. ए. अझहर, मोहसीन खान, अरुणा लांडगे, उज्वला दत्त, अनीता भंडारी, दिपाली मिसाळ, शेख अथर, संदीपान नरवटे, नारायण पाटकर, नदीम सौदागर, विनोद उंटवाल, सय्यद हमीद, मुजम्मिल शेख आदींसह कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. नंतर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर केले.