काॅंग्रेस इच्छुकांना मुलाखती वेळी शक्तिप्रदर्शनाला मज्जाव, ६५ उमेदवार मुलाखतीसाठी हजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:47 AM2024-10-08T11:47:54+5:302024-10-08T11:48:39+5:30

कॉँग्रेसकडून डॉ. वजाहत मिर्झा, खा. डॉ. कल्याण काळे व शेख युसुफ यांनी घेतल्या मुलखती...

Congress aspirants should not show their strength during the interview, 65 candidates will appear for the interview! | काॅंग्रेस इच्छुकांना मुलाखती वेळी शक्तिप्रदर्शनाला मज्जाव, ६५ उमेदवार मुलाखतीसाठी हजर!

काॅंग्रेस इच्छुकांना मुलाखती वेळी शक्तिप्रदर्शनाला मज्जाव, ६५ उमेदवार मुलाखतीसाठी हजर!

छत्रपती संभाजीनगर : काॅंग्रेसच्या विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी दिवसभर गांधी भवन, शहागंज येथे शांततेत पार पडल्या. मुळात शक्तिप्रदर्शन करू नका, असे इच्छुकांना सांगण्यात आले होते. त्यामुळे गांधी भवनाला यात्रेचे स्वरूप आले नव्हते. इच्छुक उमेदवार व त्यांचे काही बोटावर मोजण्याइतके समर्थक कार्यकर्तेच सोबत होते.

काॅंग्रेसतर्फे नेमण्यात आलेले निरीक्षक माजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी या मुलाखती घेतल्या. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष व खासदार डॉ. कल्याण काळे व शहराध्यक्ष शेख युसुफ हेही होते. जिल्ह्यातील नऊही मतदारसंघांसाठी या मुलाखती झाल्या. फुलंब्रीपासून सुरूवात झाली. फुलंब्रीत एकूण दहा जण इच्छुक आहेत. त्यात विलासबापू औताडे, जगन्नाथ काळे, प्रा. मोहन देशमुख, संदीप बोरसे, भाऊसाहेब जगताप, वरुण पाथ्रीकर, विश्वास औताडे आदींचा समावेश आहे. कन्नडमधून माजी आमदार नामदेव पवार हे इच्छुक आहेत. ते मुलाखतीसाठी निरीक्षकांना सांगून येऊ शकले नाहीत. सिल्लोडमधून पाच जण इच्छुक आहेत. पैठणमधून पाच जण इच्छुक आहेत. गंगापूरमधून तीन जण इच्छुक आहेत. पूर्वमधून १७ जण इच्छुक आहेत तर मध्यमधून १० जण इच्छुक आहेत. पश्चिममधून १४ जण इच्छुक आहेत. त्यात डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. अरुण शिरसाट, डॉ. पवन डोंगरे, दीपाली मिसाळ, महेंद्र रमंडवाल, दिनकर ओंकार, राणोजी जाधव आदींचा समावेश आहे. पूर्वमधून डॉ. जफर खान, सीमा थोरात, डॉ. सरताज खान, हमद चाऊस, राजेश मुंडे, युसुफ मुकाती, मोहसीन अहमद, इब्राहिम पठाण आदी इच्छुक आहेत. सिल्लोडमधून बनेखा पठाण, मोहंमद कैसर, राजू गवळी, कृष्णा बावस्कर आदी इच्छुक आहेत. 

मध्यमधून स्वत: शहराध्यक्ष शेख युसुफ इच्छुक आहेत. संभाजीनगरातून एका मध्य मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्यावयाचा झाल्यास शेख युसुफ हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अन्य इच्छुकांमध्ये ॲड. सय्यद अक्रम, आमेर अब्दुल सलीम, जयप्रकाश नारनवरे, शेख अथर डॉ. खान नुजहत, ॲड. खान मसरुर आदींचा समावेश आहे. पैठणमध्ये डॉ. कांचनकुमार चाटे, रवींद्र काळे, विनोद तांबे, अनिल पटेल, दिलीप भोसले हे इच्छुक आहेत. गंगापूरमधून ॲड. मोहंमद मजहर अन्वर खान, ॲड. कैसरुदद्दीन जहिरोद्दीन, किरण पाटील डोणगावकर हे इच्छुक आहेत. वैजापूरमधून रवींद्र संचेती, ॲड प्रमोद जगताप, ॲड. राहुल संत हे इच्छुक आहेत.

उमेदवारांची शिफारसही करू....
लोकमतशी बोलताना निरीक्षक डॉ. वजाहत मिर्झा यांनी सांगितले की, आम्ही आमचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करू. त्यात उमेदवारांची शिफारस करू. महाविकास आघाडीत कोणती जागा कुणाला सोडायची यावर चर्चा सुरू आहे. त्यानंतरच उमेदवार कोण हे ठरेल. ते काही झाले तरी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू. व सत्ताही मिळवू. याही निवडणुकीत काँग्रेसच नंबर वन पार्टी राहील.

Web Title: Congress aspirants should not show their strength during the interview, 65 candidates will appear for the interview!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.