देशातील ८४ पैकी ६० राखीव जागांवर काँग्रेसने केले लक्ष केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:26 AM2019-02-28T00:26:37+5:302019-02-28T00:27:19+5:30

देशातील ८४ पैकी ६० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून, मागच्या वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित विभागाचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Congress has concentrated on 60 of the 84 seats reserved in the country | देशातील ८४ पैकी ६० राखीव जागांवर काँग्रेसने केले लक्ष केंद्रित

देशातील ८४ पैकी ६० राखीव जागांवर काँग्रेसने केले लक्ष केंद्रित

googlenewsNext
ठळक मुद्देनितीन राऊत : युद्ध नको बुद्ध हवा


औरंगाबाद : देशातील ८४ पैकी ६० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून, मागच्या वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित विभागाचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
बौद्ध महिला धम्म परिषदेसाठी ते आले होते. त्यांनी सांगितले, राहुल गांधी यांनी आदेश दिल्यास रामटेक लोकसभा लढायला मी तयार आहे. माझी यंत्रणा सज्ज आहे.
औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला वातावरण अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. राऊत यांनी आज औरंगाबाद व जालना येथील कार्यकर्त्यांचीही मते जाणून घेतली. उमेदवार कोण असावा याचीही चाचपणी त्यांनी केली. औरंगाबाद काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत राष्टÑवादीला सोडू नये, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांची असून ती मी पक्षाध्यक्षांपर्यंत पोहोचवीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. राऊत म्हणाले, युद्ध ओढवून घेण्यासारखी आज स्थिती नाही. युद्ध नको बुद्ध हवा हेच खरे.
२६ नोव्हेंबरपासून ‘संविधान से स्वाभिमान’हा कार्यक्रम आमच्या विभागामार्फत सुरू आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन मेळावे घेतले जात आहेत. दलित शक्ती नावाने पोर्टल सुरू केले असून, त्यात दलित युवकांची नोंदणी केली जात आहे. केंद्र सरकारची भूमिका दलित विरोधी आहे. त्यामुळे दलित समाज दुखावला गेला असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी रवींद्र दळवी, बाबा तायडे, डॉ. पवन डोंगरे, मनीष वाघमारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
-------------

Web Title: Congress has concentrated on 60 of the 84 seats reserved in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.