सिल्‍लोड नगर परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 03:32 PM2019-02-28T15:32:56+5:302019-02-28T15:34:37+5:30

१३ प्रभागातील २६ जागां पैकी २४ कॉंग्रेसने तर २ जागा भाजपने जिंकल्या.

Congress win's Sillod Nagar Parishad election | सिल्‍लोड नगर परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता 

सिल्‍लोड नगर परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता 

googlenewsNext

औरंगाबाद : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या सिल्लोड नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. १३ प्रभागातील २६ जागां पैकी २४ जागा आणि नगराध्यक्ष पद जिंकत कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला. 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार राजश्री राजरत्न निकम या जवळपास तब्बल 10 हजार 882 मतांच्या फरकाने विजयी झाल्या. निकम यांना 19563 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार अशोक तायडे यांना केवळ 8681 मते मिळाली. एमआयएम चे उमेदवार प्रभाकर पारधे यांना 2636 तर राष्ट्रवादीचे विनोद पगारे यांना केवळ 471 मते मिळाली. निवडणुकीत भाजपला फक्‍त २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत २६ नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी मतदान करण्यात आले होते. कॉंग्रेसकडून आमदार अब्दुल सत्तार तर भाजप-सेना युतीकडून भाजप नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. 
 

विजयी उमेदवार : 

प्रभाग क्रमांक 1:- अ.अनुसूचित जाती महिला राखीव:- डोभाळ मालताबाई रतन (काँग्रेस विजयी 1393), वाहूळ छायाबाई सांडु (860 पराभूत भाजप) ब.सर्वसाधारण दूधे सुनील सुखदेव (1347 विजयी कॉंग्रेस), मिरकर सुनील प्रभाकर (878 पराभूतभाजप),

प्रभाग क्रमांक 2:- अ.अनुसूचित जमाती महिला राखीव:- सपकाळ कडूबाई विट्ठल 1517 विजयी काँग्रेस), सपकाळ कौसाबाई कैलास ( 646पराभूत भाजप), ब.सर्वसाधारण बेग चांदमिर्जा उस्मान ( 1141 विजयी कॉंग्रेस), राउत मधुकर आनंदराव (743पराभूत भाजप).

प्रभाग क्रमांक 3:- अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव:- मोरेल्लु रूपाली मनोज (1268 विजयी भाजप), क्षीरसागर हीराबाई विश्वनाथ (1072 पराभूत कॉंग्रेस), ब.सर्वसाधारण पवार अश्विनी किरण (1316 विजयी भाजप), खांडवे शंकरराव हिम्मतराव (951पराभूत कॉंग्रेस).

प्रभाग क्रमांक 4:- अ.सर्वसाधारण महिला राखीव:- देशमुख नाजिया मतीन (1015 विजयी कॉंग्रेस), करडेल सिंधुबाई रामदास ( 109 पराभूतभाजप), ब.सर्वसाधारण शेख आसेफ नबी (1046 विजयी कॉंग्रेस), वाघ राहुल लहानु ( 78 पराभूत शिवसेना).

प्रभाग क्रमांक 5:-अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग शेख रउफ मूसा बागवान (1630 विजयी कॉंग्रेस), शेख वसीम गुलाब बागवान (807 पराभूत भाजप), ब.सर्वसाधारण महिला राखीव:- झंवर सविता मनोज (1964 विजयी कॉंग्रेस), शेख सायराबी रहीम (419 पराभूत एमआयएम).

प्रभाग क्रमाक 6:- अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव:- अब्दुल नफीसा बेगम अ सत्तार (2585 विजयी कॉंग्रेस), शेख भिकीबी मोहम्मद (276 पराभूत एमआयएम), ब.सर्वसाधारण शेख अ सत्तार हुसैन (2275 विजयी कॉंग्रेस), सय्यद अनीस फकरोद्दीन (354 पराभूत कम्युनिस्ट).

प्रभाग क्रमांक 7:- अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग:- पाटिल सुधाकर पंडितराव ( 1028 (विजयी कॉंग्रेस), पाटिल विलास पंडित ( 744 (पराभूत भाजप), ब.सर्वसाधारण महिला राखीव:- शेख शबाना बाबर ( 984विजयी कॉंग्रेस), मिरकर वृषाली सुनील (880 पराभूत भाजप ).

प्रभाग क्र मांक 8:- अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग :- सहारे नंदकिशोर (1949 विजयी कॉंग्रेस), सुदर्शन अग्रवाल (1128 पराभूत शिवसेना), ब.सर्वसाधारण महिला राखीव:- गौर कल्याणी राजेंद्र ( 1577 (विजयी कॉंग्रेस), कटारिया सरिता गोविंद (1494(पराभूत भाजप).

प्रभाग क्रमांक 9:- अ.अनुसूचित जाती :- आरके जितेंद्र शेषराव ( 1685 विजयी कोंग्रेस), निशिकांत सुरडकर ( 506 पराभूत एमआयएम), ब.सर्वसाधारण महिला राखीव:- शेख महजबीन अकील (1530 विजयी कॉंग्रेस), शेख सोफियाबी मो. अली ( 453 एमआयएम).

प्रभाग क्रमांक 10:- अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव:- सय्यद समीनाबी अनीस (1510 (विजयी कॉंग्रेस), मिसाळ छायाबाई मोतीराम ( 402पराभूतभाजप), ब.सर्वसाधारण :- अब्दुल समीर अब्दुल सत्तार (1377विजयी कोंग्रेस), शेख शाकेर अजीज ( 253 पराभूत राष्ट्रवादी).

प्रभाग क्रमांक 11;- अ.सर्वसाधारण महिला राखीव:- पठान शकिलाबी मोइनखान (2228 विजयी कॉंग्रेस), पठान जमिलाबी यासीन खान ( 789 पराभूत एम आयएम), ब.सर्वसाधारण पठान जुम्माखा गुलशेरखा ( 2134 विजयी कॉंग्रेस), बनेखा नुरखा पठान ( 755 पराभूत एमआयएम).

प्रभाग क्रमांक 12:- अ.सर्वसाधारण महिला राखीव:- पठान नसिमबी शेरखां ( 1801विजयी कोंग्रेस), संध्या जयराज प्रशाद ( 889 पराभूत भाजप), ब.सर्वसाधारण:- पठान रइसखां शेरखां (1618 विजयी कॉंग्रेस), मछिन्द्र रत्नाकर धाडगे (1011पराभूत शिवसेना).

प्रभाग क्रमांक 13:- अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव:- शकुंतला दामोधर बंसोड़ (1276 विजयी कॉंग्रेस), रेखा किशोर अग्रवाल (610 पराभूत अपक्ष), ब.सर्वसाधारण:- शेख मोहसिन अब्दुल रहीम ( 1026 विजयी कॉंग्रेस), सुनील दिगंबर प्रशाद ( 699 पराभूत भाजप). 
 

प्रभाग क्र.३ वगळता इतर सर्व प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Web Title: Congress win's Sillod Nagar Parishad election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.