शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ओबीसींना आपसात लढवण्याचा काँग्रेसचा डाव: नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:29 PM

शरद पवार यांना वगळून काँग्रेसवर टीकेची झोड

छत्रपती संभाजीनगर : ओबीसींच्या जाती-जातींमध्ये भांडणे लावून काँग्रेसला सत्तेचा मलिदा खायचा आहे. ओबीसींचे आरक्षणही संपवायचे आहे, असा घणाघात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगरच्या जाहीर सभेत घातला. काँग्रेसचा हा डाव उधळून लावण्याचे आवाहन त्यांनी केले. एक ओबीसी पंतप्रधान काँग्रेसच्या डोळ्यात खुपतोय, अशी जळजळीत प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी नोंदवली. महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय भाजपचे नेते राहत नाहीत. परंतु मोदी यांनी आजच्या भाषणात कुठेही शरद पवार यांच्यावर थेट वा अप्रत्यक्ष टीका केली नाही. काँग्रेसवर मात्र टीकेची झोड उठवली व शहजादे असा उल्लेख करीत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची ग्रॅहमहर्थ मैदानावर सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेते रावसाहेब दानवे, खा. डाॅ. भागवत कराड यांच्यासह मंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर, संतोष दानवे, संजना जाधव, अनुराधा चव्हाण, प्रशांत बंब आदी महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

२६ मिनिटांचे भाषण......सुमारे २६ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मराठवाड्यातील इन्फ्रास्ट्रक्चर, सिंचन, सोयाबीन कापसाचा भाव, छत्रपती संभाजीनगर नामकरण आणि शहराचा पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र शासनाने केलेली मदत हे मुद्दे होते.

भाषणाची सुरुवात मराठीतून.....भाषणाची सुरुवातही मराठीतूनच केली. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. गोरक्षणाथांचा प्रकट दिन आहे. लहुजी साळवे वस्तादांची जयंती आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली. नाना पेशवा यांचेही त्यांनी नामस्मरण केले.

७० हजार कोटींहून अधिक गुंतवणूकसमृद्धी महामार्गामुळे मराठवाडा मुंबईला जोडला गेला, मराठवाड्यात महामार्गांची कामे वेगाने सुरू आहेत, रेल्वे सेवेचा अत्याधुनिक विकास व विस्तार केला जात आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीतील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. ७० हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीचे करार झाले आहेत, ४५ हजार कोटींचे उद्योग आले आहेत, भविष्यात अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार असून त्यासाठी राज्यात सर्वात मोठे इंडस्ट्रियल पार्क उभे राहणार आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढतील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

भविष्यात महाराष्ट्राला भारताचे नेतृत्व करायचे आहे !भविष्यात महाराष्ट्राला विकसित भारताचे नेतृत्व करायचे आहे, त्यासाठी राज्यात विकासाचे अनेक प्रकल्प वेगाने सुरू आहेत. नवे उद्योग येत आहेत, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना आखल्या जात आहेत, पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. महाविकास आघाडीने सत्तेवर असताना प्रगतीची गती रोखून धरली. विकासाच्या विरोधात असलेली काँग्रेस आणि त्यांचे साथीदार महाराष्ट्राचे कधीच हित करणार नाहीत, म्हणून या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा आणि महायुतीला विजयी करा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी