मिरची मार्च, २०२० मार्च, २०२१
( किलो)
गुंटूर २२० रु. १८० रु
बेडगी ३५० रु. ३०० रु.
लवंगी २४० रु. २१० रु.
-----
मसाला मार्च, २०२० मार्च, २०२१
( किलो)
हळदकांडी १३० रु. १८० रु.
खसखस ९०० रु. १,५०० रु.
धने १२० रु. १२० रु.
जिरे १८० रु. १८० रु.
तीळ १६० रु. १३० रु.
खोबरे २२० रु. २१० रु.
मेथी ७० रु. ८० रु.
---
गरम मसाला मार्च, २०२० मार्च, २०२१
( १० ग्रॅम)
लवंग १० रु. १० रु.
नाकेशवर १६ रु. ३० रु.
कर्णफुल ७ रु. १५ रु.
वेलदोडे ४० रु. ३० रु.
मसाला इलायची १६ रु. १२ रु.
शहाजिरे १० रु. १० रु.
काळे मिरे १० रु. १० रु.
जायपत्री २५ रु. ३० रु.
रामपत्री १६ रु. १६ रु.
दगडफुल ३५ रु. (छटाक) ३५ रु.
-------
चौकट
नवीन मिरची बाजरात
गुंटूरची नवीन मिरची बाजारात दाखल झाली आहे. हळूहळू आवक वाढेल. मागील मिरची खरेदीचा हंगाम मार्च ते मे असतो. मागील वर्षी लॉकडाऊन काळात विक्री प्रभावित झाली. गेल्या वर्षीच्या शिल्लक साठा व नवीन आवक सुरू, यामुळे मिरचीचे सध्या भाव कमी आहे.
श्रीकांत खटोड, व्यापारी
----
वार्षिक खरेदी एकदाच
वर्षभराचे तिखट व गरम मसाला एकदाच उन्हाळ्यात खरेदी करण्यात येते, नंतर भाव वाढले तरी चिंता नसते. यंदा मिरचीचे भाव कमी असल्याने, सर्वसामान्य साठी दिलासादायक बाब आहे.
गायत्री मिटकर, गृहिणी, बन्सीलालनगर
---
मसाला घरी बनविण्यावर भर
बाजारात रेडिमेड मसाला मिळतो, पण घरी बनविलेल्या मसाल्याची चव वेगळीच लागते. यामुळे उन्हाळ्यात आम्ही वर्षभराचा मसाला तयार करून ठेवतो. हळद महागली आहे, पण बाकीचे भाव स्थिर आहेत.
सुरेखा जोशी, गृहिणी, शिवाजीनगर