औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील पाडापाडीसंदर्भात सोमवारी सकाळी शिवसेनेच्या मनपातील पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यावर चक्क दबावतंत्राचा वापर केला. बायपासवरील कारवाईने शिवसेनेची मते खराब होतील, अशी भीतीही दाखविण्यात आली. काहीही करा कारवाई थांबवा, असा सज्जड दमही आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.सोमवारी सकाळी मनपा आयुक्त सुटीवरून परत येताच स्थायी समिती सभापतींच्या अॅन्टी चेंबरमध्ये आयुक्तांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मनपातील सेनेचे तिन्ही पदाधिकारी, पश्चिमचे आमदारही उपस्थित होते. तब्बल एक तासापेक्षा अधिक वेळ खलबते करण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी आवाजही चढविला होता. बीड बायपास हा एकमेव मुद्दा बैठकीत गाजत होता. आयुक्तांनी सेना पदाधिकाºयांना ठोस असे कोणतेच आश्वासन दिले नाही. बायपासवरील कारवाई थांबविण्याचे आश्वासनही दिले नाही. मी पाहतो, बघतो अशी उत्तरे आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांनी नमूद केले. आचारसंहितेत शिवसेनेकडून अशा पद्धतीचे दबावतंत्र टाकता येऊ शकते का? अशी चर्चा मनपा वर्तुळात होती. स्थायी समिती सभापतींच्या अॅन्टी चेंबरमधून आयुक्त सर्वप्रथम बाहेर आले. मला विभागीय आयुक्तांकडे बैठकीसाठी जायचे आहे, म्हणून त्यांनी काढता पाय घेतला. आयुक्त गेल्यावर थोड्या वेळाने सेनेचे पदाधिकारी बाहेर आले. बाहेर पत्रकार असल्याची कुणकुण अगोदरच सेना पदाधिकाºयांना लागली होती. बैठकीतून बाहेर येताच पश्चिमच्या आमदारांनी पत्रकारांसमोर खुलासा केला की, आयुक्त वेळकाढू धोरण स्वीकारत आहेत. पडेगाव कचरा प्रकल्पाला गती द्यावी, विविध प्रलंबित विकास कामांना गती द्यावी, बायपासवरील कारवाईचे समर्थनही आमदारांनी केले. जबाबदाºया विविध अधिकाºयांवर सोपविण्यापेक्षा आयुक्तांनी स्वत: काही जबाबदारी घ्यावी, असा सल्ला दिल्याचेही त्यांनी नमूद केले. चिरंजीव प्रसाद, ओम प्रकाश बकोरिया यांच्यामुळेच बायपासवरील कारवाई करण्यात आली. या कारवाईला ब्रेक लागू नये अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली. वास्तविक पाहता पत्रकारांनी बायपासच्या मुद्यावर एकाही सेना पदाधिकाºयांना छेडले नव्हते.
आचारसंहितेत सेनेचे मनपा आयुक्तांवर दबावतंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:39 PM
बीड बायपास रोडवरील पाडापाडीसंदर्भात सोमवारी सकाळी शिवसेनेच्या मनपातील पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यावर चक्क दबावतंत्राचा वापर केला. बायपासवरील कारवाईने शिवसेनेची मते खराब होतील, अशी भीतीही दाखविण्यात आली. काहीही करा कारवाई थांबवा, असा सज्जड दमही आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ठळक मुद्देबंद खोलीत खलबते : मनपा पदाधिकाऱ्यांसह आमदारांची उपस्थिती