औरंगाबाद : औरंगाबादेतीलएसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत तब्बल ३ वर्षांनंतर शनिवारी दोन नव्या चेसीस दाखल झाल्या. त्याचबरोबर आगामी मार्चपर्यंत एकूण २६१ नव्या चेसीस देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अखेर औरंगाबादेत नव्या ‘एसटी’च्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या ३ वर्षांपासून नवीन चेसीसअभावी नव्या बसगाड्यांची निर्मिती पूर्णपणे थांबलेली आहे. जुन्या लाल बसच्या चेसीसवर स्टील बाॅडीची बस बांधणी केली जात आहे. एसटी प्रवाशांना नवीन बस मिळणेच बंद झाले. जुन्या बसगाड्यांची केवळ पुनर्बांधणी होत आहे. परिणामी, रस्त्यावर खिळखिळ्या आणि भंगार बसगाड्या धावत आहेत. याविषयी ‘लोकमत’ने २८ ऑगस्ट रोजी ‘जुन्या सांगाड्यावर नव्या एसटीचा खेळ’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर कार्यशाळेला पुन्हा एकदा नव्या चेसीस मिळण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी २०१९मध्ये मध्यवर्ती बसस्थानकाला शेवटची लाल बस मिळाली. त्यानंतर २०२० मध्ये शिवशाही बस मिळाली.
यापुढे येत राहतील चेसीसकार्यशाळेत दोन नव्या चेसीस शनिवारी प्राप्त झाल्या आहेत. बीएस-६ निकषांप्रमाणे या चेसीस आहेत. मार्चपर्यंत चेसीस मिळत राहणार आहेत. त्यावर स्टील बाॅडीची बस बांधण्यात येणार आहे.- प्रमोद जगताप, व्यवस्थापक, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा
जिल्ह्यातील स्थितीएकूण एसटी : ५३६रोज प्रवास : १ लाख ६० हजार किलोमीटरराेजचे प्रवासी : ८० हजाररोजचे उत्पन्न : ५५ लाख रुपये