शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

जयभवानीनगरात दीडशे घरांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:09 AM

जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नागरिकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. एवढे होऊनही शनिवारी फक्त सहा कर्मचारी नाल्यात काम करताना दिसून आले.११ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर जयभवानीनगर परिसर पाण्यात बुडाला होता. या घटनेनंतर वसाहतीमधील नाल्यात असलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने चिरीमिरी न देणाऱ्यांच्या इमारतींवर हतोडा चालविला. अतिक्रमणे पाडल्यानंतर काही महिने मलबा तसाच पडून होता. दीड महिन्यापूर्वी महापालिकेने नाला १५ फूट रुंद आणि आठ ते दहा फूट खोल केला. या नाल्यात भूमिगत गटार योजनेचे पाईप, मेनहोल तयार करण्यात आले आहेत.पहिलाच पाऊसशनिवारी सायंकाळी झालेला वादळी वारा आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसानंतर जयभवानीनगर पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणेच जलमय झाला. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. घरगुती सामानासह धान्यही खराब झाले. ठिकठिकाणी असलेले ड्रेनेजचे चेम्बर ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. प्रत्येक रस्त्यावर किमान गुडघ्यापर्यंत येईल एवढे पाणी साचले. महापालिकेने ज्या दीडशे घरांसमोर नाला रुंद आणि खोल करून ठेवला त्या नागरिकांचे सर्वात जास्त हाल सुरू झाले. त्यांना घरातून बाहेर येता येईना.त्रस्त नागरिकांचा जनआक्रोशजयभवानीनगर येथे नाल्याच्या दोन्ही बाजूला राहणा-या १५० पेक्षा अधिक घरांमधील एक हजारांपेक्षा अधिक नागरिक मागील २४ तासांपासून ताटकळत बसले आहेत. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि आक्रोश पाहायला मिळत आहे. योग्य नियोजनच नव्हते तर नाला कशासाठी रुंद केला, असा संतप्त सवालही नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी महापौरांसमोरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.जयभवानीनगरातील शंभू सहानी यांच्या घरात पॅरालिसिस झालेली व्यक्ती आहे. त्यांना उपचारासाठी घरातून बाहेर आणणे अवघड आहे. सुभाष टाळकर, रेवजीनाथ पवार, भगवान साळुंके यांच्या घरात ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही. लता पवार या महिलेच्या घरातील धान्य पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले. शारदा पातळक यांनी पंधरा दिवसांपासून पाण्याचे टँकर आले नसल्याचे नमूद केले.

टॅग्स :floodपूरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका