छत्रपती संभाजीनगर : विद्युतीकरणानंतर मनमाड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गावर प्रथमच इलेक्ट्रिक इंजिनसह कंटेनर वाहून नेणारी रेल्वे धावली. ही रेल्वे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते दौलताबाद अशी धावली.
मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण गतवर्षी पूर्ण झाले. डिसेंबरअखेर या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याने या मार्गावर विजेवर रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रतीक्षा केली जात आहे. या सगळ्यात १७ मार्च रोजी रात्री या नव्या विद्युतीकृत रेल्वे मार्गावर पहिली इलेक्ट्रिक लोको ट्रेन धावली.