वीस ते बावीस दिवस पावसाने दडी मारल्याने दुष्काळाच्या भीतीने शेतकरी भेदरला होता. मात्र, उशिरा का होईना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, चार दिवस अति पाऊस पडल्याने कपाशी व तुरीची झाडे सुकू लागली आहेत. या पिकांची मंडळ कृषी अधिकारी भीमराव वैद्य, उपसभापती सुनील निकम यांनी पाहणी केली.
अति पावसामुळे ही परिस्थिती आली असून, याबाबत विमा कंपनीला कळविण्यात येईल व ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही त्यांच्या बाबतीत जिल्हाधिकारी निर्णय घेतील. शासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्याबाबत अद्याप कोणतेही आदेश नाहीत, असे तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी सांगितले. पिकांना युरियाची मात्रा दिल्यास दोन-तीन दिवसांत पीक परिस्थिती सुधारेल, असा अभिप्राय त्यांनी दिला.