औरंगाबाद : कॉन्टॅ्रक्टरमार्फत कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना मूळ कंपनीकडे कायम करण्याचा दावा करता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांनी दिला आहे.अहमदनगर येथील एपिटोम कम्पोनंट प्रा. लि. या कंपनीत ठेकेदारांमार्फत कार्यरत असलेल्या ७१ कामगारांनी संघटना स्थापन करून त्यांच्यामार्फत सेवेत कायम करावे, यासाठी औद्योगिक न्यायालयात अर्ज दाखल केला. तेव्हा लेबर कॉन्ट्रॅक्टरमार्फत नियुक्त कामगार हे ठेकेदारांचे कर्मचारी असतात. त्यामुळे मूळ कंपनीकडे ते अशा प्रकारची मागणी करू शकत नाहीत, असा युक्तिवाद कंपनीकडून करण्यात आला. त्यावेळी कॉन्टॅ्रक्टरकडून नियुक्त कामगारांना या अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत सेवेतून कमी करू नये, असा अंतरिम आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले होता. औद्योगिक न्यायालयाच्या या आदेशाविरोधात कंपनीने अॅड. टी. के. प्रभाकरन यांच्यामार्फत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले. ही याचिका सुनावणीसाठी आली असता, याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला की, स्वतंत्र लायसन्स असलेल्या कॉन्टॅ्रक्टरमार्फत कर्मचारी नियुक्त होते. त्या कॉन्ट्रॅक्टरला बडतर्फ केल्यानंतर त्याच्यामार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवाही संपुष्टात येते. याची दखल घेऊन औद्योगिक न्यायालयाने अर्जदार कामगारांची याचिका फेटाळण्याऐवजी त्यांना सेवेत ठेवण्याचे आदेश दिले. कामगारांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, औद्योगिक न्यायालयाने त्यांच्यासमोर दाखल तक्रारीवर निर्णय होईपर्यंत कामगारांना सेवेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे औद्योगिक न्यायालयाकडून सदर अर्जावर निर्णय होईपर्यंत तरी कामगारांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे.
कंत्राटी कामगार कायम नाही
By admin | Published: January 02, 2015 12:36 AM