सिल्लोड : जळगाव-औरंगाबाद महामार्गावर सोमवारी एका आयशरने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात कार्तिक लोणकर, धनंजय बेलेवार (रा. पिंपळगाव पेठ) हे दोन तरुण ठार झाले. याप्रकरणी मयतांच्या नातेवाइकांनी जोपर्यंत ठेकेदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यासमोर चार तास ठिय्या आंदोलनानंतर अखेर सिल्लोड शहर पोलिसांनी रस्त्याचे काम बांधकाम करणारे श्री. श्री. कन्स्ट्रशनचे ठेकेदार व मालक श्रीकांत काटोड व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतरच मयताच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.
जळगाव - औरंगाबाद महामार्गावर वखार महामंडळाच्या समोर डांबरी रस्त्याचे काम घेतलेले श्री श्री कन्स्ट्रशनचे ठेकेदार व मालक श्रीकांत काटोड यांनी सहा महिन्यांपासून रस्त्याच्या पश्चिम बाजूकडील अर्धा डांबरी रोड बेकायदेशीररीत्या खोदून ठेवला. त्यामध्ये माती भरलेली असून, त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही चिन्ह, बॅरेकेट, लावलेले नाही. या ठिकाणी खड्डा पडलेला असून, ठेकेदाराने तो भरणे आवश्यक होते, तरीदेखील ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने सोमवारी रात्री दोन तरुणांचा बळी गेला आहे. याप्रकरणी मृतकाचे काका सुभाष लोणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
140921\img_20210914_174703.jpg
क्याप्शन
महामार्ग पोलिसांनी अपघात स्थळी भेट देऊन पंचनामा केला व नागरिकांमध्ये जण जागृती केली यावेळी
पोलीस निरीक्षक नंदनी चानपूरकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड व कर्मचारी दिसत आहे.