औरंगाबाद : भारतात स्त्रीवादी साहित्यास १९ व्या शतकात सुरुवात झाली. मात्र, तत्पूर्वी मौखिक परंपरेतही स्त्रीवादी साहित्याची निर्मिती झाली असल्याचे मत स्त्रीवादी इतिहासाच्या अभ्यासक डॉ. उमा चक्रवर्ती यांनी मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रातर्फे ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर ११ ते २५ जानेवारी या दरम्यान ऑनलाइन आंतरविद्या शाखीय रिफ्रेशर कोर्सचे आयोजन केले आहे. या कोर्सचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या सोमवारी करण्यात आले. केंद्राचे संचालक डॉ. एन. बंदेला अध्यक्षस्थानी होते. कोर्समध्ये देशभरातून ४० प्राध्यापक सहभागी होणार आहेत. डॉ. उमा चक्रवर्ती ‘१९ व्या शतकापासून स्त्रीवादी साहित्याची परंपरा ते आजपर्यंतचे लेखन’ या विषयावर बोलत होत्या. यावेळी पाचगणी येथील प्रा. तेजन आझादी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कोर्स समन्वयक तथा अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. मोहम्मद अब्दुल राफे यांची उपस्थिती होती.