छत्रपती संभाजीनगर : एका राजकीय नेत्याचा मुलांच्या अकाउंटवरून धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी कमेंट सोशल मीडियावर करण्यात आली. ही कमेंट दुसऱ्या एका अकाउंटवरून फॉरवर्ड करण्यात आली. या प्रकरणात सायबर पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा सायबर ठाण्यात नोंदविला, तर ज्या अकाउंटवरून कमेंट करण्यात आली. त्या अकाउंटधारकाने खाते हॅक झाल्याची तक्रार नोंदविली. त्यानुसार, गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सायबरच्या निरीक्षक प्रवीण यादव यांनी दिली.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरील या https://instagram.com/_musharafsayed_ अकाउंटधारकाने एका दुसऱ्या खात्यावरील पोस्टवर हिंदू धर्माविषयी २८ मे रोजी वादग्रस्त कमेंट केली. ही कमेंट https://instagram.com/rightwing_guy_ या खातेधारकाने विविध ठिकाणी फॉरवर्ड केली होती. शहर सायबर पोलिस सोशल मीडियात पेट्रोलिंक करीत असताना, त्यांना वादग्रस्त कमेंट आणि वादग्रस्त फाॅरवर्ड मेसेज दिसून आला. या कॉमेंटमुळे दोन धर्मांत तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील अंमलदार गोकुळ कुतरवाडे यांनी स्वत:हून दोन्ही अकाउंट्सच्या वापरकर्त्याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक प्रवीणा यादव करीत आहेत.
कमेंटकर्त्याकडून अकाउंट हॅक झाल्याचा दावाज्या अकाउंटवरून वादग्रस्त कमेंट करण्यात आली होती, ते https://instagram.com/_musharafsayed_ अकाउंट २४ मे पासून कोणीही हॅक केल्याची तक्रार राजकीय नेत्याचा मुलगा मुशरफ सय्यद सय्यद अख्तर (रा.टाइम्स कॉलनी, कटकटगेट) याने साबयर पोलिस ठाण्यात केली. त्या तक्रारीनुसार इन्स्टाग्रामचे खाते २४ मे रोजी मोबाइलवर उघडण्याचा प्रयत्न केला असता, हॅक झाल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर, २६ मे रोजी पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोबाइल नंबर बदलल्याचे दिसून आले. त्यावरून २८ मे रोजी सायबर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा नोंदविला आहे.
सोशल मिडियावर काळजी घ्यावी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणीही सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट, कमेंट, फॉरवर्ड, लाइक करण्याच्या भानगडीत पडू नये.- प्रवीणा यादव, निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.