सरपंच संघटनेच्या वतीने औरंगाबाद, नाशिक, पुणे आदी ठिकाणी विभागीय संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावगाडा हाकणाऱ्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या अडी-अडचणी ऐकून घेण्यात आल्या. वाळूजला रविवारी या दौऱ्याचा समारोप व नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक पुरुषोत्तम घोगरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मार्गदर्शक शशीकांत मंगळे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, प्रवक्ते दिनेश घाडगे, भाऊसाहेब गेराम, रामनाथ बोऱ्हाडे, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष कल्याण साबळे, कार्याध्यक्ष अय्युब पठाण, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सचिन गरड, जालना जिल्हाध्यक्षा ज्योती राऊत, जळगाव जिल्हाध्यक्ष योगेश पाटील आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील सरपंचांना संघटित करून शासन स्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्याचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी सांगितले. यावेळी कल्याण साबळे, दिनेश गागे, शशीकांत मंगळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन गरड यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष नागेश कुठारे, पाटोदाच्या उपसरपंच कपिंद्र पेरे, कन्नड तालुकाध्यक्ष नारायण जाधव, जिल्हा महिला संघटक शकिला पठाण, जिल्हा उपाध्यक्षा गायकडे, कन्नड महिला तालुकाध्यक्षा रूपाली मोहिते, काकासाहेब बुट्टे, किशोर खांड्रे, सूरज वाघ आदींसह सरपंच व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो ओळ :
वाळूज येथे सरपंच सेवा महासंघाच्या वतीने आयोजित संवाद दौऱ्याच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सचिन गरड. व्यासपीठावर संस्थापक पुरुषोत्तम घोगरे, शशीकांत मंगळे, राहुल उके आदी दिसत आहेत.
फोटो क्रमांक- मार्गदर्शन १/२
----------------------