शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

दीक्षान्त सोहळा : ५९ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी मिळणार पदवी, कुलगुरूंची पत्रकार परिषदेत माहिती

By राम शिनगारे | Published: June 20, 2023 9:12 PM

राज्यपालांच्या हस्ते दोन संकुलांचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त सोहळ्यात तब्बल ५९ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाईल. २७ जून रोजी होणाऱ्या सोहळ्याच्या दिवशीच राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दोन इमारतींचेही उद्घाटन होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा २७ जून रोजी नाट्यगृहात आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असतील. प्रमुख पाहुण्या म्हणून असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या महासचिव डॉ. पंकज मित्तल उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, परीक्षा मंडळ संचालक डॉ. भारती गवळी, प्रसिद्धी समितीचे डॉ. कैलास पाथ्रीकर, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा, संजय शिंदे यांची उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा हा दीक्षान्त सोहळा असणार आहे. यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ व मार्च-एप्रिल २०२२ या परीक्षेतील पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला संवैधानिक अधिकारी, अधिष्ठात्यांसह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोहळ्याची तयारी २५ समित्या करीत आहेत.

दोन संकुलांचे होणार उद्घाटनकुलपती रमेश बैस यांच्या हस्ते नामांकित ‘पॉल हर्बट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग ॲण्ड बायोडायव्हिसिटी’ आणि ‘व्होकेशनल स्टडीज’ या दोन अत्याधुनिक संकुलांचे उद्घाटन दीक्षान्त सोहळ्यानंतर होणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या विविध संस्थांनी ६ कोटी ६१ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याशिवाय डीएनए बारकोडिंग इमारतीमध्ये महासंगणकाचेही उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होईल.

पदव्युत्तर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धाेरणयावेळी कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबतच महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नवीन शैक्षणिक धोरण या वर्षीपासून लागू केले जाणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील प्राचार्यांच्या बैठकाही घेतल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना मिळणार पदवीअभ्यासक्रम..................... विद्यार्थीपीएच.डी.........................२९१एम.फिल.........................३२

पदव्युत्तर.........................३१३२०पदवी............................२८३२३एकूण..............................५९,९६६

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद