शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

ऑरिक सभागृहात ‘झेडपी’ची समन्वय सभा; सभेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना कानपिचक्या

By विजय सरवदे | Published: October 13, 2023 12:15 PM

वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना ‘सीईओ’ मीना यांनी दिल्या.

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ऑरिक सभागृहात गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा परिषदेची समन्वय सभा घेतली. या सभेत त्यांनी घरकुल व रोजगार हमी या योजनांचा विस्तृत आढावा घेऊन कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. याशिवाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी जिल्हास्तरावरील आणि तालुकास्तरावरील विभागप्रमुखांनी समन्वय ठेवून गतीने कामे करावीत, अशा सूचना दिल्या, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी ग्रामस्तरावर प्रत्यक्ष लाभार्थ्यांची भेट घेऊन योजनांची पूर्तता करावी, असे आवाहन केले.

जिल्हा व तालुकास्तरावरील नोडल अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे म्हणाले. समन्वय सभेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रकाश रामावत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) सुवर्णा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) अनुपमा नंदनवनकर, शिक्षणाधिकारी (नियोजन) अरुणा भुमकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता नंदकुमार अपसिंगेकर, सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता, विस्तार अधिकारी (पंचायत), शाखा अभियंता, मग्ररोहयोचे कार्यक्रमाधिकारी, सहाययक कार्यक्रमाधिकारी उपस्थित होते.

योजनांच्या उद्दिष्टांची पूर्तता करासमन्वय सभेत पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, अटल कामगार, घरकुल, मग्रारोहयो, पंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन, पाणी गुणवत्ता पाणीटंचाई, स्वच्छ भारत मिशन, कृषी, आरोग्य विभागाचा आढावा घेऊन या वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना ‘सीईओ’ मीना यांनी दिल्या. ग्राम पातळीवर होणाऱ्या कामांचे तालुका स्तरावरून नियमित रिपोर्टिंग व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद