औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाच दिवसात आठशेवर रुग्णांची भर पडत होती. मात्र आता ही संख्या २० दिवसांवर गेली आहे. जिल्ह्यात १ ते २० जुलैदरम्यान ८४८ कोरोना रुग्णांची वाढ झाली, त्याउलट १ हजार १५९ कोरोनामुक्त झाले. सलग १२ दिवस कोरोना रुग्णसंख्या ५० च्या खाली असल्याने दिलासा व्यक्त होत आहे.
तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, उपचाराच्या सोयीसुविधा वाढविल्या जात आहेत. कोरोना तपासण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. या सगळ्यात मात्र औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० च्या खाली स्थिरावल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांबरोबर मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. जुलैच्या २० दिवसांत ५१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात २ मे रोजी ८३५ कोरोना रुग्णांचे निदान झाले होते. एका दिवसातील ही रुग्णसंख्या २० दिवसांत आढळत आहे.
कोरोना रुग्णांची संख्यातारीख- रुग्ण९ जुलै-४७१० जुलै-३८११ जुलै-३३१२ जुलै-२४१३ जुलै-३०१४ जुलै-३५१५ जुलै-४८१६ जुलै-४६१७ जुलै-४११८ जुलै-३११९ जुलै-४७२० जुलै-३७