कामगार नेते ॲड. उद्धव भवलकर यांच्यावर काळाने घाला घातला. कामगारांचा योद्धा गेल्याने कामगार व चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यातून कामगारजगत अद्यापही बाहेर आलेले नाही.
महापरिनिर्वाणदिनी साहित्यिक गेले..
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या मिलिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, दलित साहित्याचे संवर्धक, चळवळीचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, मिलिंद साहित्य परिषदेचे अध्वर्यू, अनेक गरीब विद्यार्थ्यांना आईच्या ममतेने सांभाळून त्यांना प्रेरित करणारे व्यक्तिमत्त्व प्रा. ल. बा रायमाने यांनी याच महिन्यात अंतिम श्वास घेतला.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनीच प्रा. रायमाने यांची एक्झिट अंगावर सरसरून काटा आणणारी ठरली.
तीन नगरसेवकांची प्राणज्योत मालवली...
कोरोना काळात सतत मदतीसाठी धावणारे शिवशंकर कॉलनी, बालाजीनगरचे धडाडीचे नगरसेवक नितीन साळवी यांची ७ जुलैला, तर पडेगावचे रावसाहेब आम्ले यांची ८ जुलैला प्राणज्योत मालवली. आंबेडकरनगरचे माजी नगरसेवक कचरू सोनवणे हे नागरिकांच्या मदतीसाठी अग्रेसर होते. त्यातच त्यांना काळाने हेरले.
उमेदीचा पत्रकार पडद्याआड...
शहरातील पत्रकार राहुल डोलारे यांना कोरोनाने हेरले. काळाने घाला घातल्याने कुटुंबाचा आधार गेला. त्यांच्या जाण्याने लेखणी थंडावली.
जैन समाजाने मोठे व्यक्तिमत्त्व गमावले
श्री वर्धमान श्वेतांबर जैन स्थानकवासी श्रावक संघाचे माजी अध्यक्ष तथा दक्षिण मध्य जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कन्हैयालाल रुणवाल यांचे दोन दिवसांपूर्वीच (दि.२९ डिसेंबर) निधन झाले. ती पोकळी भरून निघणे शक्य नाही.
- कामगार क्षेत्रात मोठी हानी झाली
- लोकप्रतिनिधींनाही कोरोनाने पछाडले
- आरोग्य क्षेत्रात काम करणारे पाच कोरोना योद्धे
-उपनिरीक्षकांसह पाच पोलीस कर्मचारीदेखील शहराने गमावले