औरंगाबाद : कोरोना टेस्टसाठी व्यापाऱ्यांनी तपासणीसाठी एकच गर्दी केली आहे. मागील दोन दिवसांत ९ हजार व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १८६ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी तीन आरोग्य तपासणी केंद्रे रविवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू करण्यात आली. व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच प्रत्येक केंद्राबाहेर गर्दी केली होती. शाहगंज, टीव्ही सेंटर आदी भागांत तर व्यापाऱ्यांनी दूरवर रांग लावली होती. टीव्ही सेंटर भागात व्यापाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने हर्सूल भागातील केंद्रावरील कर्मचारी बोलावून घेतले. अतिरिक्त कर्मचारी मागून याठिकाणी तपासणी करावी लागली. रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरात ५ हजार ३८९ व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९९ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना तातडीने महापालिकेच्या कोविड केअर सेंटरवर पाठविण्यात आले. शनिवारी महापालिकेने ४ हजार ४१८ व्यापाऱ्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये ८७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत ९ हजार ८१० व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
६ हजार ३३२ नागरिकांची कोरोना टेस्टमहापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिक आणि शहरात येणाऱ्या प्रवाशांची रविवारी दिवसभर कोरोना चाचणी केली. दिवसभरात तब्बल ६ हजार ३३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १३३ पॉझिटिव्ह आढळून आले. १६६ नागरिकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.
गुलमंडी हादरलीऔरंगपुरा येथील नाथ सुपर मार्केटमधील शिबिरात १३६ व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. गुलमंडीवरील एक व्यापारी आपल्या कुटुंबातील तीन सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी आले. तिघेही पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या कुटुंबातील ३० जणांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण २५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. रामनगर येथे १४ आणि संभाजी कॉलनी येथे १४ विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच महापालिकेने शहरातील ६ चेक पॉइंटसह काही वसाहतींमध्ये ५ हजार ६२९ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये १६७ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
रविवारची आकडेवारीनाक्यावर झालेली तपासणी -७७७पॉझिटिव्ह संख्या -३४लाळेचे नमुने -१२सीसीसी नमुने -१५४टास्क फोर्स टीम - ५३८९पॉझिटिव्ह - ९९
केंद्र तपासणी पॉझिटिव्हजुना मोंढा ३२८ ०२ अल्तमश कॉलनी ११३ ००टीव्ही सेंटर २५३ १४ रिलायन्स मॉल २४३ ११
तीन तपासणी केंद्रांवर महापालिकेला व्यापाऱ्यांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. महापालिकेने दिवसभरात तीन संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले.