औरंगाबाद : जोपर्यंत देशभरातील संपूर्ण बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाहीत, तोपर्यंत उद्योगांची उत्पादन क्षमता गती घेणार नाही. उत्पादित मालाला मागणीच नसल्यामुळे उत्पादन क्षमता मंदवाली आहे. पुरवठादारांकडे आॅर्डर येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. औरंगाबादच्या उद्योगनगरीमधील बहुतांश सर्व कंपन्या ५० टक्के उत्पादन क्षमेतेने सुरू आहेत.
यासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, अलीकडे १९ जुलै रोजी नऊ दिवसांचा लॉकडाऊन उघडला आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांना देश-विदेशातील उद्योगांकडून मिळणाºया आॅर्डर जिल्ह्याबाहेर वळण्याची भीती होती. त्यामुळे प्रशासनाची विशेष परवानगी घेऊन कामगारांची कंपनीतच व्यवस्था केली व हाती असलेल्या आॅर्डर पूर्ण केल्या. जवळपास शंभर- सव्वाशे उद्योगांनी या प्रकारे ग्राहकांचा विश्वास संपादन केला. औरंगाबादचे लॉकडाऊन उठले; पण पुणे, सोलापूर, मुंबईतील काही भागांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे तेथील बाजारपेठा बंद आहेत. देशभरातही पूर्ण क्षमतेने अजून बाजारपेठा उघडलेल्या नाहीत. मागील चार महिन्यांपासून उद्योगांवर विपरीत परिणाम झालेला आहे. उद्योगांची स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो. उद्योग व त्यात काम करणारे कामगार- कर्मचारी सुरक्षित राहिले पाहिजेत, यासाठी शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये मनपाच्या वतीने अँटिजन टेस्ट घेतल्या जात आहेत. यासाठी मनपाला उद्योगांकडून प्रती टेस्ट ५०० रुपये दिले जातात.
चिकलठाण्यात अँटिजन टेस्टला सुरुवातमासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, शुक्रवारपासून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे कर्मचारी, कामगारांसाठी महापालिकेच्या वतीने अँटिजन टेस्ट केल्या जाणार आहेत. ४दोन दिवसांपासून रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीत मनपाच्या पथकांनी अँटिजन टेस्ट घेतल्या. चिकलठाणा येथील ‘मासिआ’च्या कार्यालयात उद्यापासून तीन दिवस या टेस्ट घेतल्या जाणार आहेत.