औरंगाबाद : जिल्ह्याने सोमवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यूवर मात केली. गेल्या २४ तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात मनपा हद्दीत ८ आणि ग्रामीण भागात ८ अशा १६ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार घेऊन १७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या महिन्याभरानंतर पुन्हा एकदा दोनशेखाली गेली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, १६ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा सक्रिय रुग्णांची संख्या दोनशेखाली गेली होती. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आलेख २५ ऑगस्टपर्यंत घसरता होता. मात्र, त्यानंतर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली. गेली काही दिवस ही संख्या दोनशेवर होती. जिल्ह्यात सध्या १९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ५२० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ७५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ७ आणि ग्रामीण भागातील १० अशा १७ रुग्णांना सोमवारी सुट्टी देण्यात आली.
---
मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर १, सातारा परिसर १, अन्य ६
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १, गंगापूर ४, वैजापूर २, सिल्लोड १.